⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2024
Home | जळगाव जिल्हा | Breaking ! उज्ज्वल निकमांची पुन्हा सरकारी वकील म्हणून फेरनियुक्ती

Breaking ! उज्ज्वल निकमांची पुन्हा सरकारी वकील म्हणून फेरनियुक्ती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२४ । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ॲड. उज्वल निकम (Ujjwal Nikam) निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढविली. मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी निकम यांना पराभूत केलंय. यांनतर आता उज्ज्वल निकम यांची पुन्हा एकदा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते न्याय विभागाच्या कक्षेत पुन्हा दाखल झालेत.

मुंबईत यंदा अत्यंत चुरशीची लढत ठरली ती उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात. कारण, भाजपने या मतदारसंघातून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे, काँग्रसेच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम यांच्यात रोमहर्षक लढत झाली. मात्र, या लढतीत उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला आहे. पण, पराभवानंतर अवघ्या 12 दिवसांतच सरकारने त्यांनी पुन्हा राज्याच्या विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती केली आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी निकम यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी हा राजीनामा राज्य विधी आणि न्याय विभागाकडे सोपावला होता. त्यामुळे निकम यांच्याकडील असलेले प्रलंबित खटले सरकार कोणाला सोपवणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अशातच मात्र त्यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम २४ (८) नुसार उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून फेरनियुक्ती केलीय. त्यामुळे आता राज्यभरात विविध जिल्ह्यातील उज्वल निकम प्रकरणांत पुन्हा काम पाहणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.