जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२४ । हैदराबाद, गोवा आणि पुण्यानंतर आता जळगाव विमानतळावरून मुंबईसाठी विमानसेवा होणार आहे. येत्या २० जून पासून जळगाव-मुंबई विमानसेवा सुरु होणार असून भारत सरकारच्या एलाइन्स एअर या कंपनीतर्फे ही सेवा पुरवली जाणार आहे. यामुळे जळगावहून मुंबई एक ते दीड तासात गाठता येणार आहे.
जळगाव विमानतळावरून एप्रिल महिन्यात उडान योजनेअंतर्गत ‘फ्लाय ९१’ विमान कंपनीकडून गोव्यासह हैदराबाद साठी विमानसेवा सुरु करण्यात आली.यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यासाठी विमानसेवा सुरु झाली. यांनतर जळगाव-मुंबई विमानसेवा सुरु करण्याची मागणी होत होती.
अखेर केंद्राच्या उडान योजनेअंतर्गत मुंबई जळगाव-मुंबई या विमान सेवेला नागरी उड्डयन मंत्रालयाकडून ३१ मे रोजी हिरवा कंदील मिळाला. यानंतर आता मुंबई- जळगाव-मुंबई या विमानसेवेला २० जूनपासून सुरुवात होत आहे.
ही विमानसेवा सध्या आठवड्यातून गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर असणार आहे. जळगावातून संध्याकाळी ६.४५ वाजता फ्लाइट उड्डाण भरून मुंबईत ८.५ वाजता पोहचेल. परतीला रात्री ८.३० वाजता फ्लाइट निघून मुंबईत ९.४५ वाजता पोहचेल. विमान कंपनीने तिकीट विक्री सुरु केली असून या रुट्या आरसीएस सेवेत समावेश नाही. त्यामुळे तिकिटाची सुरुवात ३४४० रुपयांपासून होणार आहे.