⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | मोठी बातमी! गिरीश महाजन बनणार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री?

मोठी बातमी! गिरीश महाजन बनणार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२४ । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अपेक्षीत यश मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली असून फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये यासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी प्रचंड प्रयत्न केले. पण देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम आहेत. अशात देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर महाराष्ट्रात भाजपचा उपमुख्यमंत्री कोण असेल? असा मोठा प्रश्न आहे.

यातच भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले नेते गिरीश महाजन यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन हे सध्या राज्यातील भाजपचे दोन नंबरचे नेते आहेत. याशिवाय ते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते आहेत.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आपल्याला पक्ष संघटनेसाठी उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीपासून मुक्त करावं, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या याच मागणीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली.

राज्यात देवेंद्र फडणवीस हे भाजपचे सध्याच्या घडीतील प्रमुख आणि सर्वात मोठे नेते आहेत. ते राज्याचे मुख्यमंत्री देखील होते. याशिवाय त्यांनी गृहमंत्रीपदही सांभाळलं आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. यात फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असणारे गिरीश महाजन यांचे नाव सध्या चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर दोन नंबरचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.