⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगाव जिल्हा दूध संघात मेगा भरती, पहा कसा करणार अर्ज

जळगाव जिल्हा दूध संघात मेगा भरती, पहा कसा करणार अर्ज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्यादित जळगाव, मध्ये विविध पदांच्या ८६ जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

या पदांसाठी होणार भरती?

१) स्वीय सहाय्यक

२) सहाय्यक (मुंबईसाठी)

३) सहाय्यक

४) सहाय्यक प्रयोगशाळा

५) टेक्निशियन

६) रेफ्रिजरेशन ऑपरेटर

७) इलेक्ट्रिशियन

८) पंप ऑपरेटर

९) फिटर

१०) वेल्डर

११) प्लांट ऑपरेटर

१२) बॉयलर अटेंडट

शैक्षणिक पात्रता : जाहिरात पहावी

वयोमर्यादा : १८ ते ३८

परिक्षा शुल्क जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लि. जळगावच्या सर्व शाखांमध्ये २९ मे, २०२१ पासून ७ जून, २०२१ पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सुटीचे दिवस वगळता स्वीकारले जातील.

अर्ज शुल्क : १००० रुपये/- जीएसटी सह

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : २९ मे, २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ७ जून, २०२१ रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

महत्वाची सूचना :

१. एका उमेद्वाराचा एकच अर्ज स्वीकारण्यात येईल.

२. अर्ज स्विकारणे अथवा नाकारणे इ. बाबतचे अंतिम अधिकार संघाचे राहतील.

३. दिनांक ७ जून, २०२१ रोजी उमेद्वाराची वयोमर्यादा कमीत कमी १८, जास्तीत जास्त ३५ वर्ष राहील, व जळगांव दूध संघातील कामकाजाचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमीत कमी १८, जास्तीत जास्त ३८ वर्ष पर्यंत राहील.

४. असिस्टंट / टेक्निशियन वेतन श्रेणी असि / टेक्नि. 18500-320-11700-355-15250-390-19150-430-23450 मुळ वेतन व्यतिरिक्त, महागाई भत्ता (चालू दर ७८%), घरभाडे भत्ता ५%, धुलाई भत्ता, व्यावसायिक विकास भत्ता, वैद्यकीय भत्ता, कॅन्टीन भत्ता आणि संघाच्या नियमांनुसार इतर फायदे आहेत.

५. ई-मेल द्वारे आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

६. संघाचे आवश्यकतेनुसार व कामकाजाच्या सोईनुसार संघ ठरवेल त्या विभागात / ठिकाणी उमेदवारास कामकाज करावे लागेल.

७. मराठी, इंग्रजी टायपिंग (श.प्र.मि. वेग) व अनुभव बाबत अर्जात स्पष्ट उल्लेख करावा.

८. परिक्षार्थीला कोणत्याही प्रकारचा प्रवास व इतर भत्ता अनुज्ञेय रहाणार नाही. स्वखर्चाने संघाने ठरवून दिलेल्या वेळेत परिक्षा केंद्रावर उपस्थित रहावे लागेल. ९. नोकरीसाठी केली जाणारी कोणत्याही प्रकारची शिफारस अर्जदाराची अपात्रता ठरेल.

१०. नियुक्ती करीता गुणवत्ता यादी नुसार मूळ दस्तऐवजाची/कागदपत्र/प्रमाणपत्राच्या प्रत्यक्ष पडताळणी (document verification) नंतरच आदेश दिला जाईल. कागदपत्र नकली, त्रूटी, खाडाखोड केलेली, अपूर्णता आढळल्यास गुणवत्तेनुसार पुढील उमेद्वारास पाचारण करण्यात येईल.

११. परिक्षा वेळेत अथवा तारखेत बदल करण्याचा व तत्संबंधीत इतर अधिकार संघाचा राहील. त्याच प्रमाणे परिक्षेसंदर्भात काही अनूचीत प्रकार घडल्यास संपूर्ण परिक्षा रद्द करण्याबाबतचा अधिकार संघ प्रशासनाने राखून ठेवला आहे.

१२. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज किंवा विहित नमून्यात आवश्यक त्या नोंदणी शुल्क तसेच पात्रता प्रमाणपत्राच्या स्वसाक्षांकित सत्यप्रती नसणाऱ्या व अपूर्ण असलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही.

 

१३. अर्जदारास ऑनलाईन परिक्षेचे वेळापत्रक, दिनांक, परिक्षा केंद्र/परिक्षा क्रमांक व अन्य माहिती संघाच्या संकेतस्थळावरुन प्राप्त करावी लागेल आणि या संदर्भात सातत्याने अपडेट रहावे लागेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.