⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | सरकारी योजना | पोस्टाच्या ‘या’ 9 योजनांमध्ये मिळेल हमीसह भरघोस परतावा, जाणून घ्या

पोस्टाच्या ‘या’ 9 योजनांमध्ये मिळेल हमीसह भरघोस परतावा, जाणून घ्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२१ । प्रत्येकाला वाटतं असतं की, आपला चांगला बँक बॅलन्स (Bank Balance) असावा.यासाठी वेगवेगळ्या बँकांत गुंतवणूक केली जाते. प्रामुख्याने जी बँक चांगला परतावा देईल, ज्या ठिकाणी पैसे सुरक्षित असतील, अशा बँकेमध्ये लोकं पैसे गुंतवतात. अलीकडे भारतीय पोस्टाच्या (Post Office) विविध योजनांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवत आहेत.

या योजनांची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यावर सरकारी हमी असते. म्हणजेच तुमचे पैसे बुडणार नाहीत. आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस आणि त्यांच्या सर्व बचत योजनांबद्दल सांगणार आहोत, आम्ही हे देखील सांगू की जर तुम्ही तुमचे पैसे या योजनांमध्ये गुंतवले तर किती वेळानंतर तुमचे पैसे दुप्पट होतील. पोस्ट ऑफिसच्या बचत योजना आणि त्यांचे व्याजदर जाणून घेऊया.

1. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (TD) 1 वर्ष ते 3 वर्षांपर्यंत सध्या 5.5% व्याज मिळत आहे. तुम्ही यामध्ये गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे सुमारे 13 वर्षांत दुप्पट होतील. त्याचप्रमाणे, तुम्हाला ५ वर्षांच्या मुदत ठेवीवर ६.७% व्याज मिळत आहे. या व्याजदराने पैसे गुंतवले तर तुमचे पैसे सुमारे 10.75 वर्षांत दुप्पट होतील.

2. पोस्ट ऑफिस बचत बँक खाते

तुम्ही तुमचे पैसे पोस्ट ऑफिस बचत खात्यात ठेवल्यास, पैसे दुप्पट होण्यासाठी तुम्हाला बराच काळ वाट पाहावी लागेल. कारण यामध्ये फक्त 4.0 टक्के व्याज मिळते, म्हणजेच तुमचे पैसे 18 वर्षात दुप्पट होतील.

3. पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव
सध्या तुम्हाला पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) वर 5.8% व्याज दिले जात आहे, त्यामुळे या व्याजदराने पैसे गुंतवले तर साधारण 12.41 वर्षात ते दुप्पट होईल.

4. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (MIS) वर सध्या ६.६% व्याज मिळत आहे, जर या व्याजदराने पैसे गुंतवले तर ते १०.९१ वर्षात दुप्पट होईल.

5. पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना
पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) वर सध्या 7.4% व्याज दिले जात आहे. या योजनेत तुमचे पैसे सुमारे ९.७३ वर्षांत दुप्पट होतील.

6. पोस्ट ऑफिस पीपीएफ
पोस्ट ऑफिसच्या 15 वर्षांच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर (PPF) सध्या 7.1% व्याज मिळत आहे. म्हणजेच, या दराने तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे 10.14 वर्षे लागतील.

7. पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी खाते
पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी खाते योजनेवर सध्या सर्वाधिक ७.६ टक्के व्याज मिळत आहे. मुलींसाठी चालवल्या जात असलेल्या या योजनेत पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे 9.47 वर्षे लागतील.

8. पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
सध्या पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) वर ६.८% व्याज दिले जात आहे. ही 5 वर्षांची बचत योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून आयकर देखील वाचवता येतो. जर या व्याजदराने पैसे गुंतवले गेले तर ते सुमारे 10.59 वर्षांत दुप्पट होईल.

9. पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र
पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र (KVP) योजनेमध्ये सध्या 6.9% व्याज दिले जात आहे. या व्याजदरासह, येथे गुंतवणूक केलेली रक्कम 124 महिन्यांत (10 वर्षे आणि 4 महिने) दुप्पट होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.