देवकर रुग्णालयाच्या स्टॉलला 8000 नागरिकांची भेट
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२२ । जळगाव येथील सागर पार्कवर झालेल्या रेडिओ ऑरेंज एक्स्पोमध्ये देवकर रुग्णालयाच्या स्टॉलला तब्बल 8000 नागरिकांनी भेटी देऊन सवलतीच्या दरातील शस्त्रक्रियांची माहिती जाणून घेतली.
रुग्णालयातर्फे मोतीबिंदू व फेको शस्त्रक्रिया तसेच महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत न येणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात केल्या जातात. याशिवाय केवळ 300 रुपयात सोनोग्राफी, दीडशे रुपयात डिजिटल एक्स-रे व फक्त शंभर रुपयात ईसीजी केला जातो. याविषयी सविस्तर माहिती स्टॉलवर बॅनरद्वारे दिली गेली होती.
स्टॉलवरील हे बॅनर वाचून जवळपास आठ हजार नागरिकांनी या सर्व योजनांची सविस्तर माहिती जाणून घेतली. रुग्णालयाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 17 ते 21 मार्चपर्यंत झालेल्या या एक्स्पोमध्ये मुख्य प्रायोजक म्हणून देवकर रुग्णालयाला सर्वात प्रशस्त आणि मोठा असा स्टॉल उपलब्ध करून देण्यात आला होता.
अधिक माहितीसाठी संपर्क
मो. नं. 9370935252