जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२५ । रंगांचा सण होळी यावर्षी १४ मार्च रोजी साजरा केला जाईल. युपी, बिहारचे बाहेर राहणारे लोक या सणाला घरी जातात. परंतु यादरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी असल्याने तिकिटे उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत रेल्वेने होळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे १८ उत्सवी विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील आठ रेल्वे जळगावमार्गे धावतील. यामुळे जळगावकर प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

०९०२५ वलसाड-दाणापूर रेल्वे ३ मार्च ते ३० जूनपर्यंत तर ०९०२६ दानापूर-वलसाड ४ मार्च ते १ जुलैपर्यंत चालवली जाणार आहे. या रेल्वेला जळगावात थांबा देण्यात आला आहे.
०९०४५ उघना-पटना (७ मार्च ते २७ जूनपर्यंत), ०९०४६ पटना-उधना (८ मार्च ते २९ जूनपर्यंत), ०९५७५ राजकोट-मेहबूबनगर (३ मार्च ते ३० जून), ०९५७६ मेहबूबनगर-राजकोट (४ मार्च ते १ जुलैपर्यंत) चालवली जाणार आहे. ६ मार्च ते २६ जूनपर्यंत ०९१२९ बांद्रा-रेवा अनारक्षित रेल्वे जळगावमार्गे धावणार आहे.