77 वर्षांच्या आजींची कमाल ! नशिराबाद नगरपंचायतीच्या निवडणुकीत जिंकल्या

डिसेंबर 22, 2025 3:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावमधील नशिराबाद नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी लागला असून या निवडणुकीत 77 वर्षांच्या आजीबाईं नगरसेवकपदी विजयी झाल्या आहे. जनाबाई रंधे असं निवडून आलेल्या आजीबाईचे नाव असून कोणत्याही वयात तुम्ही काहीही करु शकतात, याचे या आजी उत्तम उदाहरण आहे.

janabai randhe

नशिराबाद नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे (BJP) प्रभाग क्रमांक ७ (अ) मधून जनाबाई रंधे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. विशेष म्हणजे, जनाबाई रंधे या पायात चप्पल घालत असल्याने त्यांनी निवडणुकीच्या काळात उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत अनवाणी पायानेच संपूर्ण प्रभाग पिंजून काढला.

Advertisements

‘गावातील रस्ते आणि तिथली माणसं माझीच आहेत, तिथे चप्पल कशाला हवी?’ अशी त्यांची साधी भावना मतदारांना भावली. आजही त्या गावात अनवाणीच फिरताना दिसतात. नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर जेव्हा त्या नगरपरिषद प्रांगणात आल्या, तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले.

Advertisements

कार्यकर्त्यांची आणि जवळच्या व्यक्तींची गळाभेट घेताना त्यांचे डोळे पाणावले. हे पाहून उपस्थितही भावूक झाले होते. वयाच्या ७७ व्या वर्षी जिथे अनेकजण निवृत्तीचा मार्ग स्वीकारतात, तिथे जनाबाईंनी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी स्वीकारून तरुणांसमोरही एक आदर्श ठेवला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now