जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२२ । रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण प्रयागराज छिक्की स्थानकावर इंटरलाॅकिंगचे कामासाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतला आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या ७ रेल्वे गाड्या शनिवारपासून (दि.१२) रद्द केल्या आहेत.
या गाड्या रद्द
गाडी क्रमांक २२९४७ सूरत–भागलपूर एक्स्प्रेस १२ मार्चला रद्द केली आहे. गाडी क्रमांक २२९४८ भागलपूर-सूरत एक्स्प्रेस १४ मार्च, गाडी क्रमांक १२५१९ लोकमान्य टिळक टर्मिनस-कामाख्य एक्स्प्रेस १३ मार्च, गाडी क्रमांक १२५२० कामाख्य-एलटीटी एक्स्प्रेस १० मार्च, गाडी क्रमांक ८२३५५ पटना-सीएसएमटी एक्स्प्रेस ९ व १३ मार्च, गाडी क्रमांक ८२३५६ सीएसएमटी-पटना एक्स्प्रेस ११ व १५ मार्च, गाडी क्रमांक १९०४५ सूरत-छपरा एक्सप्रेस ९, ११, १३ मार्च, गाडी क्रमांक १९०४६ छपरा-सूरत एक्स्प्रेस ११, १३ व १५ मार्चला रद्द झाली आहे.
हा बदल लक्षात घेऊनच प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. दरम्यान, ब्लॉकमुळे आधीच आरक्षण केलेल्या प्रवाशांची मात्र गैरसोय होणार आहे.
दरम्यान, रेल्वेने प्रवाशांची सोय लक्षात घेऊन मोठा निर्णय घेतला आहे. देशात सातत्याने कमी होत असलेल्या कोरोना रुग्णांनंतर एकीकडे DGCA ने 27 मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, रेल्वे मंत्रालयाने बर्याच दिवसांनी गाड्यांमध्ये अनारक्षित डबे बसवण्याची चर्चा केली आहे.
आता 23 मार्च 2020 नंतर सुरू होईल
रेल्वेच्या या निर्णयामुळे आता प्रवाशांना स्वस्तात प्रवास करता येणार आहे. खरं तर, मार्च 2020 मध्ये, देशातील कोरोनाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने 23 मार्च 2020 पासून ट्रेनमधून अनारक्षित डबे हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा डबा बसवल्यानंतर आता प्रवाशांना विनाआरक्षण प्रवास करता येणार असून त्यामुळे प्रवासाचा खर्च कमी होणार आहे.