प्रवाशांनो लक्ष द्या! मेगाब्लॉकमुळे भुसावळ, जळगाव मार्गे धावणाऱ्या 7 रेल्वे गाड्या रद्द..
जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२४ । जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात १ ते ११ ऑगस्टपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे भुसावळ, जळगाव, चाळीसगावमार्गे धावणाऱ्या सात गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. विभागात तांत्रिक कार्य करण्यासाठी हा ब्लॉक घेतला जातो आहे.
रेल्वे क्रमांक २२१२४ अजनी-पुणे हमसफर एक्सप्रेस ६ ऑगस्ट, रेल्वे क्रमांक २२११७ पुणे-अमरावती एक्सप्रेस ७ ऑगस्ट, रेल्वे क्रमांक २२१४१ पुणे-नागपूर हमसफर ८ ऑगस्ट, रेल्वे क्रमांक २२११८ अमरावती-पुणे एक्सप्रेस ८ ऑगस्ट, रेल्वे क्रमांक २२१४२ नागपूर-पुणे हमसफर एक्सप्रेस ९ ऑगस्ट, रेल्वे क्रमांक २२१३९ पुणे-अजनी हमसफर एक्सप्रेस १० ऑगस्ट व रेल्वे क्रमांक २२१४० अजनी-पुणे हमसफर एक्सप्रेसची ११ ऑगस्टला घावणारी फेरी रद्द करण्यात आली आहे.
सुरत-ब्रह्मपूर रेल्वेला २९ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
मध्य रेल्वेने भुसावळ, जळगाव, धरणगाव मार्गे धावणारी सुरत-ब्रह्मपूर या विशेष रेल्वेला मुदतवाढ देऊन २९ नोव्हेंबरपर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरतमधून निघणारी ही गाडी धरणगाव, जळगाव, भुसावळ, अकोला, नागपूर, रायपूर, टिटलगढ, विजयनगरमार्गे ब्रह्मपूरला पोहोचते. उन्हाळ्याप्रमाणे पावसाळ्यातही गर्दी असल्याने ही रेल्वे बंद केल्यास प्रवाशांची गैरसोय होईल आणि या मार्गाने धावणाऱ्या अन्य रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढेल. त्यामुळे सुरत-ब्रह्मपूर रेल्वेला २९ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.