---Advertisement---
गुन्हे चोपडा

गंभीर : ६ वर्षीय चिमुकलीवर धारदार वस्तूने वार, जळगावात उपचार सुरू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२२ । मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्या एका कुटुंबातील सहा वर्षीय चिमुकलीवर शेजारीच राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने धारदार वस्तूने वार केल्याची घटना चोपडा शिवारातील शिरपूर बायपास रोडवर घडली आहे. यात चिमुकली गंभीररित्या जखमी झाले असून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

knife attack

चोपडा शिवारातील शिरपूर बायपास जवळ भाईदास काना बारेला हे पत्नी जानुबाई आणि चार मुलांसह वास्तव्याला आहे. ते मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवारी, ८ फेब्रुवारी रोजी जानुबाई बारेला ह्या कामानिमित्त शेतात गेल्या होत्या तर भाईदास काना बारेला हे मध्यप्रदेशात कामानिमित्त गेले होते. त्यावेळी चिमुकली रितू उर्फ रिता (वय-६) ही घरी एकटी होती. त्यांच्या घराच्या शेजारी किरण बारेला आणि त्याची अल्पवयीन बहिण हे देखील राहतात.

---Advertisement---

दरम्यान दुपारी २ वाजेच्या सुमारास घरापासून काही अंतरावर असलेल्या ‘हॉटेल सुनिता’ जवळ किरणची अल्पवयीन बहिण हिने चिमुकल्या रितूवर धारदार वस्तूने वार केले. रितूच्या तोंडावर, हातावर, पायाच्या मांडीवर आणि डोक्याच्या मागच्या भागावर वार केल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. दरम्यान ‘मुलीला का मारले?’ याची माहिती मिळू शकली नाही.

चिमुकलीच्या नातेवाईकांनी तिला तातडीने चोपडा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रात्री ८ वाजता दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---