---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा महाराष्ट्र

Big Breaking : भुसावळात ५०० किलो गांजा पकडला, एलसीबीची मोठी कामगिरी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२३ । जळगाव जिल्हा गांजाचे हब बनत चालले असे चित्र आहे. काही महिन्यांपूर्वी शेकडो किलो गांजा हस्तगत केल्यावर शुक्रवारी पुन्हा भुसावळात तब्बल ५०० किलो गांजा पकडण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारे जळगाव एलसीबीने ही मोहीम फत्ते केली.

IMG 20230211 WA0000 jpg webp webp

भुसावळ शहरात बाहेर गावावरून एक वाहनामध्ये गांजा येत असल्याची गोपनीय माहिती एल.सी.बी.चे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाली असता त्यांनी तत्काळ पथक भुसावळला रवाना करून जळगांव रोडवर सापळा लावण्यास सांगितले होते. गुरुवारी रात्री पथकाला १०.१५ वाजेच्या सुमारास जळगांव रोडवरील जॉली पेट्रोल पंपाजवळ पुलाखाली एक वाहन बरेच वेळ थांबलेल्या अवस्थेत दिसते. पथक पाहणी करण्यासाठी गेले असता वाहनांमध्ये ड्रायव्हर नव्हता. पथकाने अधिकाऱ्यांना याबाबत कळविले. अधिकाऱ्यांच्या आदेशावरून पथक रात्रभर वाहनाजवळ लक्ष ठेवून होते. गुरुवारी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी वाहन असलेल्या ठिकाणी दुपारी दोन वाजेला भेट दिली व वाहन भुसावळ तालुका पोलील स्टेशनला आणले.

---Advertisement---

पथकाने केलेल्या चौकशीत वाहनात वाहनांमध्ये गांज्याच्या १६ बॅग पाच किलो वजनाचे असे चाळीस गठ्ठे एकूण ५०० किलो ६०० ग्रॅम असा पंचात्तर लाख रुपयांचा गांजा, नऊ लाखांचे इलेक्ट्रिक साहित्य मिळून आले. पथकाने दहा लाख रुपयांच्या आयशर वाहनासह सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. वाहनातील चालकाला स्थानिक गुन्हे शाखा पथकातील उपनिरीक्षक गणेश चौबे, कर्मचारी सचिन महाजन, प्रमोद लाडवंजारी, अक्रम शेख अशांनी मालेगाव येथून ताब्यात घेतले.

गांजा पकडण्याची कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, अनिल जाधव, कलमाकर बागुल, अनिल देशमुख, श्रीकृष्ण देशमुख, अमोल देवडे, अजीत जाधव, सुनील दामोदरे, ईश्वर पाटील अशांनी मिळून केली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---