जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात वाढत्या चोऱ्या, दरोडे व संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर आलं असून पोलिस प्रशासनाने गुन्हेगारांचे हिस्ट्रीशीट तयार केले आहे. यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिस्ट्रीशीटरवरील सराईत ४१ गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘टू प्लस’ची प्रभावी अंमलबजावणी करीत गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यात येत आहे. त्यात ४१ सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलिसांनी तयार केलेल्या हिस्ट्रीशीटचा तपासात मोठा फायदा होत आहे. तसेच या गुन्हेगारांवर वॉच ठेवणे देखील सोपे झाले आहे. सराईत गुन्हेगार, त्यांच्या टोळ्या, तसेच दोनहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींचा त्यात समावेश आहे. गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलिस प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.
अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, शहर पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे, बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ, तालुका निरीक्षक महेश गायकवाड यांच्याकडून संबधितांना शहरबंदी, गावबंदीचे आदेश बजाविण्यात आले. गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस प्रशासनातर्फे शहरातील उपद्रवी यांना गणेशोत्सवाच्या काळात शहरबंदीचे प्रस्ताव तयार करून अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांना पाठविण्यात आले.
या प्रस्तावावर नखाते यांनी निर्णय देत १८ सप्टेंबरपर्यंत उपद्रवींच्या शहरबंदीचे आदेश काढले. यात शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १७, बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २० आणि तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ४ मिळून ४१ जणांना १८ सप्टेबरपर्यंत शहरबंदी, गावबंदी करण्यात आली.संबधितांना शहरबंदी, गावबंदीचे आदेश बजाविण्यात आले. शहरबंदीत कुण्याही राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश नाही. गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे डीवायएसपी पिंगळे यांनी सांगितले.
असे आहे हिस्ट्रीशीटर
सराईत गुन्हेगार, त्याने केलेले गुन्हे, तसेच त्याच्याशी संबंधित माहिती हिस्ट्रीशीटमध्ये समाविष्ट असते. गुन्हेगाराचे मूळ नाव, वापरली जाणारी टोपण नावे, त्याचे फोटो, फिंगरप्रिंट, त्याने आजपर्यंत केलेल्या गुन्ह्यांची माहिती, त्याचे नातेवाईक, साथीदारांची माहिती, तपासात समोर आलेले ठावठिकाणे, त्याचे संपर्क क्रमांक अशी सर्व माहिती हिस्ट्रीशीटमध्ये असते.