---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का ; पदाधिकाऱ्यांसह 400 कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२४ । एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून यातच शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसलाय. जळगावमधील पदाधिकाऱ्यांसह 400 कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय.

400 activists join shinde grup jpg webp

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर व चोपडा परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील तसेच शरद पवार गटातील जवळपास 400 कार्यकर्त्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रात्री उशिरा शिंदे गटात प्रवेश केला. वेळी मंत्री गुलाबराव पाटील , बुलढण्याचे खासदार प्रतापराव जाधव व माजी आमदार चिमणराव पाटील उपस्थित होते. हे सर्व कार्यकर्ते जवळपास 60 ते 70 वाहनातून बुलढाण्यात पोहोचले होते. बुलढाणामधील रेसिडेन्सी क्लब येथे सदर पक्षप्रवेश पार पडला असून यामुळे जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला आणि शदर पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

---Advertisement---

दरम्यान, काही दिवसापूर्वी भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील, नगराध्यक्ष करण पवार आणि त्याचे अनेक सहकारी, पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश केला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---