Yawal : दरोड्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या इंदूरच्या ४ भामट्यांना पकडले

ऑगस्ट 7, 2025 11:17 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल चोपडा रस्त्यावर विना क्रमांकाच्या कारमध्ये पाच संशयित थांबले होते. ते दरोडा किंवा चोरीच्या उद्देशाने आल्याची माहिती मिळताच पोलिस पथकाने कारवाई करून विरावली फाट्याजवळ चौघांना ताब्यात घेतले. तर एक जण अंधारात पळून जाण्यात यशस्वी झाला. अटकेतील चौघे मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे चाकू व अन्य साहित्य सापडले.

kulbhushanpatil firing case arrest

मंगळवारी मध्यरात्री किनगावकडून एक वाहन चोपडा रस्त्याने यावलकडे येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यातील संशयित दरोडा किंवा चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे कळताच त्यांनी एपीआय अजयकुमार वाढवे, उपनिरीक्षक अनिल महाजनव पथकाला कारवाईसाठी पाठवले. पथक मध्यरात्री २ वाजता चोपडा रस्त्यावर निघाले. विरावली फाट्याच्या पुढे अंधारात विना क्रमांकाची इर्टिगा कार रस्त्याच्या कोपऱ्यात उभी दिसली. पोलिसांना पाहून संशयितांनी कार पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कारमधील चौघांना ताब्यात घेतले.

Advertisements

अशी आहेत चारही संशयितांची नावे

Advertisements

पोलिसांनी कारमधील हातात हत्यार व तोंडावर काळ्या रंगाचा मास्क लावलेले सोहेल मकसूद खान (वय २७), इम्रान अली शहजाद अली शाह (वय ३६, रा. खजराना इंदूर), परवेज अब्दुल गनी (क्य ३५, रा. चंदन नगर, इंदूर) व मोहंमद वसीम मोहंमद रशीद (वय ३४, रा. सरवटे रोड, इंदूर) यांना ताब्यात घेतले. संशयितांच्या कारला दोन्ही बाजूने नंबरप्लेट नव्हती. पण, गाडीच्या आत दोन नंबरप्लेट आढळल्या.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now