जिल्ह्यातील विविध प्रकल्पात 33 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक
जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जून २०२१ । सद्य:परिस्थितीत जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांसह तेरा मध्यम व 96 लघु प्रकल्पांचा, प्रकल्पीय उपयुक्त साठा हा 50.406 टीएमसी इतका असून या प्रकल्पांमध्ये आज 16.50 टीएमसी म्हणजेच 32.73 टक्के इतका उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी हा साठा 36.78 टक्के इतका म्हणजेच 4.05 टक्के इतका अधिक होता.
सध्या जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पात 14.09 टीएमसी उपयुक्त साठा असून यात हतनूर 17.06%, गिरणा 37.02%, तर वाघूर धरणात 65.08% उपयुक्त पाणीसाठा आहे. तर तेरा मध्यम प्रकल्पांमध्ये 1.57 टीएमसी, 96 लघु प्रकल्पात 0.84 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.
जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांचा, प्रकल्पीय उपयुक्त साठा हा 50.406 टीएमसी इतका असून आजच्या दिवशी या सर्व प्रकल्पांमध्ये 16.50 टीएमसी म्हणजेच 32.73 टक्के इतका आहे. तर मागील वर्षी हा साठा 18.54 टीएमसी इतका होता.
जिल्ह्यातील हतनूर धरणात 1.54 टीएमसी (17.06%) गिरणा धरणात 6.84 टीएमसी (37.02%) तर वाघूर धरणात 5.71 टीएमसी (65.08%) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. तर जिल्ह्यातील अभोरा मध्यम प्रकल्पात 52.06%, मंगरुळ 38.68%, सुकी 48.57%, मोर 54.92%, तोंडापूर 44.98%, बहुळा 29.87%, अंजनी 21.91%, भोकर 16.55% उपयुक्त साठा शिल्लक असल्याचे उप कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.