२८ दिवसांनी १३ प्रवाशांना घेऊन पोलीस बंदोबस्तात निघाली बस

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । एसटी कर्मचाऱ्यांचे संप सुरु करून सलग 28 दिवस झाले. त्यानंतर आज 27 रोजी दुपारी दोन वाजता जामनेर जळगाव ही बस पोलीस बंदोबस्तात 13 प्रवाशांना घेऊन पोहोचली. यावेळी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत आगारप्रमुख धनराळे यांना घेराव घातला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सविस्तर असे की,  गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचारी हे पगारवाढीसह एसटी महामंडळ शासनात विलीनीकरण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण राज्यभरात संप पुकारला आहे. मात्र, शासन स्तरावर कोणताही निर्णय झाला नसून, दुसरीकडे राज्य शासन सेवासमाप्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यात व तालुक्यामध्ये एसटी बस सेवा चालू करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

 

या अनुषंगाने दिनांक 27 रोजी दुपारी दोन वाजता जामनेर जळगाव ही बस जामनेरकडे येत असताना नेरी येथून एसटी बसला पोलीस बंदोबस्तात जामनेर आगारात आणण्यात आले या वेळी बसमध्ये 13 प्रवासी होते. एसटी बस जामनेरात येताच संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. आगारप्रमुख यांना घेराव घालत आमच्यासमोर एसटी बस आणून आमच्या भावनेशी खेळू नका अन्यथा याचा परिणाम मोठा होईल असा इशारा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी दिला.

यावेळी मोठ्या प्रमाणावर बसस्थानकात गर्दी जमा झाली. ही बस तात्काळ पोलीस बंदोबस्तामध्ये जळगावकडे रवाना करत नेरीपर्यंत या बसला पोलीस बंदोबस्त देण्यात आला. यामुळे कोणत्याही प्रकारची घटना घडली नाही. मात्र यापुढे अशाप्रकारे जामनेर बस स्थानकात एसटी बस आणण्याचा प्रयत्न करण्यात आला तर त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी माध्यमांशी बोलताना संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी दिला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar