⁠ 
मंगळवार, जून 25, 2024

जळगावच्या 27 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; कुटुंबियांना मोठा धक्का…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२४ । जळगावात तरुणांमध्ये आत्महत्यासारखे प्रमाण वाढताना दिसत असून अशातच आता जळगाव शहरातील 27 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस झाली आहे. दयावान गौतम सोनवणे असे मयत झालेल्या तरुणाची नाव असून त्याच्या आत्महत्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. दरम्यान, याप्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, जळगाव शहरातील नंदवन नगर परिसरात दयावान सोनवणे हा तरुण आपल्या आई वडील भाऊ आणि पत्नी यांच्यासोबत वास्तव्यास होता. मजुरीचे काम करून तो उदरनिर्वाह करत होता. गुरुवारी ६ जून रोजी रात्री जेवण करून तो राहत्या घरातील वर्षा खोली जाऊन झोपला घरातील इतर सर्वजण घरात खालच्या घरात झोपले होते. मध्यरात्री दयावान यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळी लहान भाऊ कुंदन हा उठविण्यासाठी गेला असता त्याला भाऊ दयावान याने गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. शेजारी राहणाऱ्या तरूणांच्या मदतीने खाली उतरवून तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ माधुरी सोसे यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला. दयावान याला आठ दिवसांपुर्वीच मुलगी झाली होती. घरात आनंदाचे वातावरण असतांना तरूणाच्या जाण्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे.