जिल्ह्यात २७ लाख नागरिकांनी घेतली कोरोना लस
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत २७ लाख ३४ हजार ५८४ नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. यात २० लाख ४९ हजार ९६५ जणांना पहिला तर ६ लाख ८४ हजार ६१९ जणांना दुसरा डोस देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी प्रसिध्दपत्रकाद्वारे दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत २० लाख ४९ हजार ९६५ लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर ६ लाख ८४ हजार ६१९ लाभार्थ्यांना दुसरा असे एकूण २७ लाख ३४ हजार ५८४ लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.
यात शहरी भागातील ११ लाख २१ हजार ९८२ तर ग्रामीण भागातील १६ लाख १२ हजार ६०२ नागरीकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरीकांनी कोरोना लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार बुधवार दि.२७ रोजी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.