⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | बातम्या | २७ कोटींचा निधी गावाच्या विकासासाठी दिशादर्शक ठरावा – पालकमंत्री

२७ कोटींचा निधी गावाच्या विकासासाठी दिशादर्शक ठरावा – पालकमंत्री

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

१२४ ग्रामपंचायतींचा पालटणार चेहरामोहरा

जळगाव लाईव्ह न्युज । ४ एप्रिल २०२२ । जनसुविधा योजनेच्या अंतिम सुधारित तरतुदीतून जिल्ह्यातील १२४ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामासाठी २७.२८ लक्ष निधी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार मंजूर करण्यात आला आहे. डीपीडीसीच्या २७ कोटींचा निधीद्वारे होणारी कामे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक होऊन ग्रामपंचायत कार्यालय गावाच्या सर्वांगीण उन्नतीकरीता दिशादर्शक ठरावे, अशी अपेक्षा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

जिल्हा नियोजन अंतर्गत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी २३ कोटी ५६ लाख रुपयांचा (९०% निधी) निधी जिल्हा परिषदेकडे वितरित केला आहे. यातून १२४ ग्रामपंचायतीच्या सुसज्ज इमारती होणार असून कार्यन्वित होणार आहेत. एका ग्रामपंचायतीसाठी २२ लाख रुपये निधी मंजूर केला असून जि.प.सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी १२४ ग्रा.पं. कार्यालय इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतीच्या वास्तू या जुन्या झाल्या असून काही मोडकळीस आलेल्या आहेत. या समस्येची दखल घेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी फर्निचरसह ग्रामपंचायत कार्यालय उभारणी कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून आता जिल्ह्यातील १२४ गावांना फर्निचरसह ग्रामपंचायत कार्यालय इमारत उपलब्ध होणार आहे. या कामांसाठी २७ कोटी २८ लक्ष रूपयांच्या निधीला मंजुरीपैकी तात्काळ २३ कोटी ५६ लक्ष निधी जिल्हा परिषदेला वितरित झाला असून लवकरच विकास कामे सुरू होणार आहेत.

तालुका निहाय ग्रामपंचायत कार्यालय
जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये अमळनेर तालुक्यातील ७ ग्रा.प. – गांधली, जळोद , वाघोदा, नंदगाव , लोणसीम, बहादरवाडी व डांगरी प्रगने, बोदवड तालुक्यात ३ -भानखेडा, मानमोडी व हिंगोणे, भुसावळ तालुक्यात ५ ओझरखेडा, शिंदी, मोंढाळे, गोजरा व वराडसीम, चाळीसगाव तालुक्यात ७- कुंझर, लोंढे, चैतन्यतांडा, इच्छापुर तांडा, बेलदारवाडी, ओझर व पिंपरी खुर्द, एरंडोल तालुक्यात ९- आनंदनगर, हनुमंतखेडे बुद्रुक, ब्राह्मणे , सोनबर्डी, गालापूर, रवंजे खुर्द, निपाने, भातखेळा व टोळी; जळगाव तालुक्यात ६ – दापोरा, तुरखेडा , सुभाषवाडी, तरसोद , धानवड व पिलखेडा, जामनेर तालुक्यात११- वडगाव बुद्रुक, कुंभारी बुद्रुक, ओझर, लोंढरी बुद्रुक , एकुलती, वाकी खुर्द, मोहाडी , पळासखेडा बुद्रुक, देवळसगाव, सामरोद व शेरी , मुक्ताईनगर तालुक्यात ५- धामणगाव, काकोडा, इच्छापुर ,निमखेडी व चारठाणा, पाचोरा तालुक्यात १३- सावखेडा खुर्द, होळ , डोकंलखेडा, आसनखेडा, परधाडे, वरसाडे प्र.बो. पिंप्री बु. प्र.भ. , सारवे बु.प्र.भ. , अंतुर्ली बुद्रुक, पिंप्री बु.प्र.पा. (डांभुर्णी), सारोळा खुर्द, मोंढाळे , सांगवी प्र.लो.- कुर्‍हाड, भडगाव तालुक्यात ४- बांबरुड प्र.ब. पथराड ,शिंदी व कोळगाव, पारोळा तालुक्यात १४- कन्हेरे ,शेवगे बुद्रुक, सावखेडे होळ, म्हसवे , मुंदाणे प्र. अ., टोळी , तरवाडे, करंजी, कंक राज ,कोळपिंप्री, ढोली, शिरसमनी, मंगरूळ व लोणी बुद्रुक, धरणगाव तालुक्यात १०- रेल , कवठाळ, शेरी, पिंपळेसिम , बिलखेडा, चांदसर, अनोरे, भोणे , जांभोरे व कंडारी , चोपडा तालुक्यात ९- घुमावल, वडोदा, नरवाडे, मेलाणे, वैजापूर, सुटकार, उमर्टि , कमळगाव व देव्हारी , रावेर तालुक्यात १४- कोचुर बुद्रुक, निरूळ , वाघाडी , वाघोड , शिंदखेडा, मोरगाव बुद्रुक, धामोडी, उदळी बुद्रुक, मंगरूळ , ऊटखेडा, निमड्या, आंदलवाडी, रणगाव व रायपुर, आणि यावल तालुक्यात ६- आडगाव , म्हैसवाडी, बामणोद , मोहराळा व अट्रावल व कोरपावली, या १२४ गावांना नवीन ग्रामपंचायत कार्यालये मिळणार आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.