भुसावळ पालिकेच्या अखेरच्या सभेत 263 विषयांना मंजुरी
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२१ । सत्ताधार्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असतानाच पालिकेची अखेरची सर्वसाधारण सभा आज 27 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात झाली. या सभेत 264 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. रस्ते काँक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक, डांबरीकरण, गटारी, ज्येष्ठांसाठी बाक बसवणे यासह अन्य मिळूनप 263 विषयांना सभागृहाने मंजुरी दिली तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गाचे रेल्वेकडे हस्तांतरणाच्या विषयावर विरोधकांनी जोरदार आक्षेप नोंदवल्यानंतर हा विषय तहकूब करण्यात आला.आता विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा केली जात आहे.
आज सोमवारी चालू पंचवार्षिक काळातील अखेरची सभा नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात झाली. विषय क्रमांक 169 हा डॉ.आंबेडकर मार्गाचे रेल्वेकडे हस्तांतरण हा विषय असल्याने त्यावरून सभा गाजण्याची शक्यता होती. या विषयाला विरोधकांनी हरकत नोंदवल्यानंतर तो तहकूब करण्यात आला. व्यासपीठावर नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, विभागप्रमुखांची उपस्थिती होती.
हे देखील वाचा :
- करिअरमध्ये यश मिळेल, जबाबदाऱ्या वाढणार ; शनिवारचा दिवस कसा जाईल तुमच्या राशीसाठी?
- Jalgaon : कुत्र्याच्या कारणावरून दगड, दांडक्याने मारहाण; तिघे जखमी
- जळगावात महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन
- Jalgaon : जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे त्रुटीपुर्ततेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन
- वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर जळगावात पोलीस दलातर्फे हेल्मेट जनजागृती रॅली