जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । यावल शहरात दरवर्षी रावण दहनाचा कार्यक्रम घेण्यात येतो. यंदा छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळातर्फे विजयदशमी १५ ऑक्टोबर रोजी होणारा. रावण दहनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. येवले यांनी दिली असून, याबाबत यावल पोलीसांना देखील पत्र पाठविले आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, यावल शहरात गेल्या २५ वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ यांच्यावतीने व्यास मंदिरच्या पटांगणात रावण दहनाचा कार्यक्रम होत असतो. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव आणि शासनाच्या निर्बंधामुळे रावण दहनाचा कार्यक्रम गेल्या वर्षी झालं नाही. यावर्षी विजयादशमीच्या १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. रावण दहनाचा कार्यक्रम शासनाच्या नियमानुसार सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी जास्त गर्दी होऊ नये, म्हणून यंदा होणारा रावण दहनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी यावल पोलीस निरीक्षकांना निवेदनातून दिले आहे.