भुसावळात 23 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त

मे 4, 2025 12:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२५ । जळगाव शहराचे डीवायएसपी संदीप गावित व त्यांच्या टीमने भुसावळातून अटक केलेल्या आरोपीच्या घरातून 23 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केले. दरम्यान या प्रकरणात तीन जणांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली.

md drug jpg webp

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शाहूनगर मध्ये शहर पोलीस स्टेशनने टाकलेल्या धाडी मध्ये ड्रग्स जप्त करण्यात आले होते. यामधील मुख्य आरोपी सरफराज याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशी मध्ये याकुब याचे नाव समोर आले. त्यावर पाळत ठेवण्यात आल्यानंतर जळगाव येथे आल्यावर त्याला अटक करून चौकशी केली असता भुसावळ येथील अन्सार भिती, वसीम खान यांची नावे समोर आली.

Advertisements

त्यांनी यामधील वसीम खान यांच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून 23 ग्रॅम एमडी ड्रग्स मिळून आले. ही कारवाई दोन मे च्या रात्री सुरू झाली असता तीन मे च्या सकाळी तीन वाजता संपली. या कारवाईमध्ये डीवायएसपी संदीप गावित, शहर पोलीस स्टेशनचे एपीआय नाईक, रीडर गायकवाड व इतर कर्मचार्‍यांसह फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी उपस्थित होती.

Advertisements

तिन्ही आरोपींना आज दुपारी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली. यावरून पुन्हा जळगाव व भुसावळ शहरात एमडी ड्रग्स मोठ्या प्रमाणात आपले पाय फोफावत असल्याचे दिसून आलेले आहेत.

भुसावळ शहरामध्ये बाजारपेठ हद्दीमध्ये झालेल्या कारवाईतून बाजारपेठेमध्ये एमडी ड्रग्स यापूर्वीही पकडण्यात आलेले आहेत. असे असताना स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती नाही यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment