जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२५ । अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यामधून भीषण अपघाताची घटना समोर आलीय चकलागम परिसरात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत यात २२ कामगार मृत्युमुखी पडले.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांपैकी १९ कामगार आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील गिलापुक्री टी इस्टेटमधील रहिवासी होते. घटनास्थळी सध्या बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत १३ कामगारांचे मृतदेह सापडले आहेत. उर्वरित अवशेषांचा शोध सुरू आहे.

हे कामगार रस्त्याच्या बांधकामाच्या ठिकाणी जात असताना हैलोंग-चकलागम रस्त्यावर मेटेलियांगजवळ ट्रकचा ताबा सुटला आणि तो डोंगरावरून खाली कोसळला.

अपघाताच्या वेळी २२ कामगार त्यात होते. ट्रक दरीत पडताना रस्त्याने जाणाऱ्यांनी पाहिले आणि जवळच्या पोलिस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचाव आणि मदत कार्य सुरू केले. या अपघातात ट्रकमध्ये असलेल्या सर्व मजुरांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १३ मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उर्वरित मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यात आहे आहे. पोलिस आणि स्थानिक नागरिक बचाव आणि मदत कार्य करत आहेत.








