जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ । भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या एरंडोल शाखेमार्फत विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात असून शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील एकूण दहा आदर्श शिक्षकांची निवड करून त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
त्यात महिला व बालविकास विभागांतर्गत सुरू असलेले यशवंत बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ तळई संचलित अनाथ निराधार निराश्रित मुलांचे बालगृह खडके बु. ता.एरंडोल येथील अधीक्षक मधुकर कपाटे यांना अनाथ मुलांचे पालन पोषण संगोपन व पुनर्वसनासाठी आणि मुलांच्या सुप्त गुणांना वाव देऊन विविध उपक्रम राबवून बालकांना देशाचे भावी नागरीक घडविण्याचे कार्य करुन राष्ट्र निर्माण करण्यासाठी अतुलनीय योगदान देत असल्यामुळे सागर महाजन जिल्हा समन्वयक, मिलिंद सूर्यवंशी एरंडोल तालुका अध्यक्ष, राकेश राजपूत तालुका उपाध्यक्ष,तुषार माळी तालुका मुख्य सचिव,चेतन पाटील तालुका सचिव यांनी आदर्श शिक्षक सन्मानपत्र,भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेची माहिती पुस्तिका आणि गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. या अतुलनीय कार्याबद्दल मधुकर कपाटे यांना विचारणा केली असता बालगृह चे मुख्य आधारस्तंभ आणि माझे प्रेरणास्त्रोत दादासाहेब प्रभाकर पाटील यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शनातून प्रेरणा घेऊन हे कार्य करण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले सदरचा सन्मान हा माझा एकट्याचा नसून संस्थेतील सर्व अनाथ निराधार बालकांचा आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्व कर्मचारी बांधवांचा असल्याचे सांगितले.
सन्मानपत्र मिळाल्याबद्दल संस्था अध्यक्ष दादासाहेब प्रभाकर यशवंत पाटील, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विजयसिंह परदेशी साहेब,जिल्हा परीक्षा अधिकारी एस.आर.पाटील साहेब,अधिक्षक आर.पी.पाटील अध्यक्ष बाल कल्याण समिती सौ.वैजयंती तळेले,सदस्य प्रदिप पाटील,डॉ.चव्हाण मॅडम, नितीन विसपुते,परिविक्षा अधिकारी सारिका मेतकर,जयश्री पाटील मॅडम,लिलाई बालगृह अध्यक्ष व्ही.एस.पाटील यांनी अभिनंदन केले.