बातम्याराष्ट्रीयवाणिज्य

UPI, EPFO ते शेतकरी कर्ज.. आजपासून या 10 नियमात बदल; तुमच्यासाठी जाणून घेणे महत्वाचे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२५ । नवीन वर्षाच्या सुरुवातीसह, 1 जानेवारी 2025 पासून देशभरातील नागरिकांवर परिणाम करणारे अनेक नियामक आणि आर्थिक बदल झाले आहेत. EPFO प्रक्रियेपासून ते LPG किंमत आणि UPI मधील बदल, नवीन वर्षात तुमच्या बजेटवर परिणाम होऊ शकतो. आम्ही तुम्हाला आजपासून होणाऱ्या नियमांबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया..

शेतकरी कर्ज नियम
भारतीय रिझर्व्ह बँकेने नवीन नियम लागू केले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना आता कोणत्याही हमीशिवाय 2 लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा मिळणार आहे, जेणेकरून भारतीय शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये. या बदलांसाठी व्यक्ती आणि व्यवसाय दोघांकडून तयारी आणि समायोजन आवश्यक असेल कारण ते नवीन वर्षात नवीन नियम आणि आर्थिक परिणामांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात.

या फोनवर व्हॉट्सअॅप होणार बंद
१ जानेवारीपासून काही अँड्रॉइड स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. जवळपास २० फोनवर व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. अँड्रॉइड ५.० आणि नवीन अँड्रॉइड स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप सेवा सुरु राहणार आहे.

UPI लिमिट
नवीन वर्षात UPI 123 वर व्यव्हार करण्याची लिमिट वाढवण्यात आली आहे. आता तुम्ही एका वेळी कमाल १०,००० रुपये पाठवू शकतात. याआधी ही लिमिट ५,००० रुपये होती.

शेअर बाजार
1 जानेवारी, 2025 पासून, सेन्सेक्स आणि इतर निर्देशांकांची एक्सपायरी डेट शुक्रवार ते मंगळवारपर्यंत बदलण्यास सुरुवात होईल. हा बदल साप्ताहिक आणि मासिक करारांवर परिणाम करतो.

LPG च्या किंमती
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नवीन वर्षात एलपीजी गॅसच्या किंमती कमी झाल्या आहेत. व्यावसायिक गॅसच्या किंमती कमी झाल्या आहेत.

EPFO चा नियम
नवीन वर्षात पेन्शनधारकांसाठी नियम बदलण्यात आले आहेत. आता पेन्शनधारक कोणत्याही बँक खात्यातून पैसे काढू शकणार आहेत. याआधी फक्त रजिस्टर बँक खात्यातून पैसे काढता येत होते.

रुपे कार्डधारकांना लाउंजचा लाभ
रुपे कार्जधारकांना आता विमानतळावरील लाउंजचा मोफत वापर करता येणार आहे. यामुळे सतत परदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे.

आयकर नियम
२०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आयकरबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.या नवीन नियमांमुळे कर सवलत आणि कर कपातीत बदल होणार आहेत. नागरिकांना कर कपातीचा फायदा होऊ शकतो.

एनबीएफसींच्या मुदतठेवींच्या नियमांमध्ये बदल
१ जानेवारीपासून एनबीएफसींच्या मुदत ठेवींसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. यात मॅच्युरिटीपूर्वी मुदतठेवी मोडणाऱ्या, तसेच ठेवींसाठी दिले जाणाऱ्या नामांकनाबाबत नियमांचा समावेश आहे.

कारच्या किमती वाढतील
१ जानेवारीपासून कार खरेदी करणे महाग होऊ शकते. मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा, होंडा, बीएमडब्ल्यू इत्यादी कार कंपन्या किमती वाढविण्याचा विचार करत आहेत. 1 जानेवारीपासून कारच्या किमतीत 3 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असे मानले जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button