जळगाव, भुसावळमार्गे आणखी 18 अतिरिक्त विशेष गाड्या धावणार; जिल्ह्यातील प्रवाशांची होणार सोय..

ऑक्टोबर 25, 2025 12:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२५ । दिवाळीनंतर आता वाढती गर्दी लक्ष्यात घेता रेल्वेनं नागपूर-पुणे, आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष या गाडयांना जळगाव, भुसावळ, पाचोरा आणि चाळीसगाव स्थानकावर थांबा देण्यात आला असून यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला.

train 1 jpg webp

दिवाळीसाठी अनेक जण कुटुंबासह गावी परतात. यादरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. आता दिवाळीनंतर अनेक जण परत आपल्या कामावर परताना दिसत आहे. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी दिसतेय. याच पार्श्वभूमीवर रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते नागपूर तसेच पुणे ते नागपूर या मार्गादरम्यान धावणाऱ्या एकूण १८ अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisements

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सहा सेवा)

गाडी क्रमांक ०१०११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २६, २८ आणि ३० ऑक्टोबरला पहाटे ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी ०४.०५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. त्याच प्रमाणे गाडी क्रमांक ०१०१२ नागपूर येथून २६, २८ आणि ३० ऑक्टोबरला रात्री १०.१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ०२.०५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. दोन वातानुकूलित द्वितीय, एक वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, चार सामान्य द्वितीय आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन, अशी डब्यांची संरचना असेल.

Advertisements

थांबे: या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकावर थांबा देण्यात आला

पुणे-नागपूर-पुणे विशेष (सहा सेवा)

गाडी क्रमांक ०१४०९ विशेष गाडी पुणे येथून २५, २७ आणि २९ ऑक्टोबरला रात्री ०८.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ०२.०५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. गाडी क्रमांक ०१४१० विशेष गाडी नागपूर येथून २६, २८ आणि ३० ऑक्टोबरला दुपारी ०४.१० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. एक वातानुकूलित द्वितीय, ११ शयनयान, सात सामान्य द्वितीय आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन, अशी डब्यांची संरचना असेल.

पुणे-नागपूर-पुणे विशेष (सहा सेवा)

गाडी क्रमांक ०१४०१ विशेष गाडी पुणे येथून २६, २८ आणि ३० ऑक्टोबरला रात्री ०८.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ०२.०५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. गाडी क्रमांक ०१४०२ विशेष गाडी नागपूर येथून २७, २९ आणि ३१ ऑक्टोबरला दुपारी ०४.१० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. एक वातानुकूलित द्वितीय, एक वातानुकूलित तृतीय, १३ शयनयान, चार सामान्य द्वितीय आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन, अशी डब्यांची संरचना असेल.

नागपूर-पुणे दरम्यान चालविण्यात येणाऱ्या १२ गाड्यांना दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामनगाव आणि वर्धा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. प्रवाशांना विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच संकेतस्थळावर करता येणार आहे. विशेष गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेच्या प्रशासनाने प्रवाशांना केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now