⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | Jalgaon Crime : चोरीच्या 16 दुचाकीसह चौघे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Jalgaon Crime : चोरीच्या 16 दुचाकीसह चौघे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२३ । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून ७ लाख ६० हजार रुपये किमतीच्या चोरीच्या १६ दुचाकी हस्तगत केल्या असून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यात दुचाकी मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्या असून यामुळे वाहनधारक धास्तावले आहे. दुसरीकडे वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिस दलाने देखील कंबर कसली आहे. दरम्यान, जळगाव शहरात विविध पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले या गुन्ह्यांचा उलगडा करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी पथकाला दिल्या.

त्यानुसार गोपनीय माहितीनुसार एरंडोल तालुक्यातील पिंप्री सिम येथील सुनील भिल यांच्याकडे चोरीची दुचाकी असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विश्वासात विचारपूस केले असता त्याने इतर चोरीच्या ३ दुचाकी काढून दिल्या. त्यानंतर ह्या दुचाकी एरंडोल तालुक्यातील नांगदुली या गावातील खुशाल पाटील व गोविंदा कोळी यांच्याकडून विना कागदपत्राच्या आधारे कमी किमतीत विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने खुशाल पाटील आणि गोविंदा कोळी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अजून ९ मोटरसायकल हस्तगत केल्या, त्यानंतर सुनील भिल याची अजून चौकशी केली असता तपासात पाचोरा तालुक्यातील हर्षल पाटील (राजपूत) यांच्याकडून चोरीच्या ४ दुचाकी हस्तगत केल्या.

दरम्यान या सर्व दुचाकी संतोष इंगोले रा. अकोला याने वेगवेगळ्या जिल्ह्यातून चोरून या चौघांकडे विल्हेवाट लावण्याचे काम दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना अटक केली. चौघांकडून ७ लाख ६० हजार रुपये किमतीच्या १६ दुचाकी हस्तगत केले आहे.याप्रकरणी सुनिल शामराव भिल (वय-३५) रा. पिंप्री सिम ता. एरंडोल, खुशाल उर्फ भैय्या राजू पाटील (वय-२०), गोविंदा अभिमन्य कोळी (वय-४५) दोन्ही रा. नागदुली ता.एरंडोल आणि हर्षल विनोद कोळी (वय-२०) रा. मोहाडी ता. पाचोरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.