जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील प्राथमिक शिक्षकांची नूतन पतपेढीतील संचालकांनी बनावट कर्ज वाटप करून ९.९० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी संचालकांसह १६ जणांना जिल्हा आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केलीय. तर याबाबत ४५ जणांवर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत असे की, भुसावळ येथील प्राथमिक शिक्षकांची नूतन पतसंस्था भुसावळ मर्यादित या संस्थेच्या संचालकांनी बनावट कर्ज वाटप करून ९ कोटी ९० लाख रुपये रकमेचा अपहार केल्याचे शासकीय लेखापाल यांच्या अहवालात समोर आले. लेखापाल प्रकाश चौधरी यांनी सोमवारी याबाबत पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हे प्रकरण जिल्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे सोपावले. आर्थिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी पथकासह भुसावळ येथे जाऊन सोमवारी दिवसभरात पतसंस्थेचे आठ माजी सभापती, संचालक व पतसंस्थेचे आठ कर्मचारी ज्यात व्यवस्थापक, कॅशियर, लिपिक, शिपाई अशांना ताब्यात घेतले. दरम्यान, पतसंस्थेचे संचालक व कर्मचाऱ्यांना अटक करून आर्थिक गुन्हा शाखेने त्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना जेलमध्ये रवानगी केली.

अटक करण्यात आलेल्यांची नावे :
गंगाराम सिताराम फेगडे (जळगाव)
हरिश्चंद्र काशीनाथ बोंडे (सावदा)
राजू लालू गायकवाड (भुसावळ)
हितेश संजय नेहेते (भुसावळ)
रमेश चिंधू गाजरे (फैजपूर)
कृष्णा गजमल सटाले (जामनेर)
मधूकर श्रीकृष्ण लहासे (पहूर)
सुरेश गंगाराम इंगळे (खिरोदा)
कैलास पंडित तायडे (जळगाव)
पंकज मोतीराम ढाके (भुसावळ)
संजय तुळशीराम चौधरी (जामनेर)
अझरुद्दीन राजेंद तडवी (फैजपूर)
राहुल लक्ष्मीकांत चौधरी (भुसावळ)
जितेंद्र सुधाकर फेगडे (भुसावळ)
राजेश देविदास लहासे (फैजपूर)
हितेंद्र अमोल वाघुळदे (फैजपूर)






