⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

दुचाकी खड्ड्यात पडून बारा वर्षीय बालकाचा जागेवरच मृत्यू

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ । शहरातील सुप्रीम कॉलनीच्या ईदगाह मैदान जवळ दुचाकी खड्ड्यात पडून १२ वर्षीय बालकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी दुपारी घडलीय. आयान सुलतान पटेल (वय १२  रा. सुप्रीम कॉलनी) असे या मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी संध्याकाळी उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

 

आयान पटेल हा आज दुपारी १२.३०  वाजता घराच्या अंगणात गल्लीतील १४ वर्षीय मित्रासोबत खेळत होता. त्याचवेळी ‘आपण दोघे दुसऱ्याच्या दुचाकीवरून एक चक्कर मारू’ या उद्देशाने आयान दुचाकीवर मागे बसला. दरम्यान सुप्रीम कॉलनीच्या ईदगाह मैदान जवळ एक मोठ्या खड्ड्या समोर आल्याने पुढे चालवणाऱ्या १४ वर्षीय मुलाचा दुचाकीवरील ताबा सुटला, त्यात दोघे खड्ड्यात पडले. यात मागे बसलेला आयान पटेल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले व वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

 

मयत आयन पटेल यांचे वडील सुलतान फकीरा पटेल हे हमालीचे काम करतात तर आई रेश्मा पटेल या गृहिणी आहेत. मोठा भाऊ तैहिद हा शिक्षण घेत आहे. अपघातात आयानचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.