⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | जळगाव जिल्हा | लोकसभा निवडणुकीच्या मतदाना वेळी ओळख पटविण्यासाठी 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार

लोकसभा निवडणुकीच्या मतदाना वेळी ओळख पटविण्यासाठी 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२४ । लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या मतदानावेळी मतदारांना मतदान केंद्रावर आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदारांना देण्यात आलेले मतदार ओळखपत्राशिवाय बारा प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र याशिवाय पारपत्र (पासपोर्ट ), वाहन चालक परवाना (लायसन्स ), केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीचे स्वतःचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, बँक,टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांचे द्वारे नॅशनल पोपुलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले जॉब कार्ड, भारत सरकारच्या सर्व मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत निर्गमित हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतनाची कागदपत्रे, खासदार आमदारांना देण्यात आलेली अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र हे 12 पुरावे मतदानासाठी आवश्यक असणार आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.