⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

१११ पाेलिसांची झाली माेफत रक्तगट,नेत्ररोग तपासणी

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई) व विभागीय केंद्र (जळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य दिनानिमित्त पोलिस अधीक्षक कार्यालयात मोफत रक्तगट तपासणी व नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते यात १११ पोलिसांची तपासणी करण्यात आली.

मोफत रक्त व नेत्ररोग तपासणी शिबिराबाबत व आरोग्याबाबत डॉ. राहुल मयूर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सह पोलिस अधीक्षक गवळी, उपपोलिस अधीक्षक (गृह) संदीप गावित यांनी मार्गदर्शन केले. प्रतिष्ठानचे विभागीय केंद्राचे सदस्य डॉ. रेणुका चव्हाण यांनी सर्व पोलिस बांधवांचे डोळे तपासून त्यांना मार्गदर्शन करून आय ड्रॉप्सचे वाटप केले.

शिबिरासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रास्ताविक प्रा. डी. पी. पवार यांनी केले. या वेळीअंजली पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी यांची उपस्थिती होती.