⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

याला म्हणतात नशीब!! कचरा वेचणाऱ्या 11 महिलांना लागला जॅकपॉट, तोही 10 कोटींचा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२३ । कोणाचं नशीब कधी आणि केव्हा बदलले याचा नेम नाही. यात कचरा वेचणाऱ्या 11 महिलांसोबत असंच काहीसं झालं आहे. केरळमधील मलप्पुरमच्या परप्पानंगडी नगरपालिकामध्ये काम करणाऱ्या 11 महिला सदस्यांना स्वप्नातही वाटले नसेल की त्यांनी प्रत्येकाने २५ रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी केलेल्या लॉटरीचे तिकीट 10 कोटी रुपयांचे असेल आणि जॅकपॉट मिळेल.

या महिला कामगारांनी लॉटरीचं तिकीट खरेदी करण्यासाठी आपापसात २५० रुपये काढले होते. यात त्यांनी मान्सून बंपर लॉटरीच्या पहिल्या पुरस्कारात 10 कोटी जिंकले आहेत.

या 11 महिला मागील दोन ते अडीच वर्षांपासून आपलं घर चालवण्यासाठी घरा-घरातून आणि कार्यालयांमधून नॉन-बायोडिग्रेडेबल अर्थात जैवविघटन न करता येणारा कचरा गोळा करतात. आता या कचरा गोळा करणाऱ्या महिलांचं नशीब पालटलं.

250 रुपयांचं तिकीट खरेदी करण्यासाठी या 11 महिलांपैकी नऊ जणींनी प्रत्येकी 25 रुपये जमा केले होते आणि इतर दोघींनी प्रत्येकी 12.5 रुपये लॉटरीचं तिकीट खरेदी करण्यासाठी दिले होते. आता त्यांची लॉटरी लागली असून त्यांनी तब्बल 10 कोटी रुपये जिकंले आहे. पी पार्वती, के लीला, एमपी राधा, एम शीजा, के चंद्रिका, ई बिंदू, कार्तियायिनी, के शोभा, सी बेबी, सी कुट्टीमालु आणि पी लक्ष्मी या महिलांनी तिकीट जिंकलं आहे.

या ११ महिलांपैकी अनेक महिला पैशांच्या आर्थिक समस्येचा सामना करत आहेत. यापैकी अनेक महिला अशा आहेत, ज्या पैसे वाचवण्यासाठी आपल्या घरापासून ते नगरपालिकेपर्यंत लांबचा पल्ला पायी जातात.

विजेत्यांपैकी एका महिलेने सांगितले कि, ‘जेव्हा आम्हाला कळले की आम्ही जॅकपॉट जिंकले तेव्हा आमच्या उत्साहाला आणि आनंदाला पारावार उरला नाही. आपण सर्वजण जीवनात अडचणींचा सामना करत आहोत आणि हे पैसे काही प्रमाणात आपल्या समस्या सोडवण्यास मदत करतील.