जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२५ । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकताच दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा दहावीचा निकाल गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत खूप कमी लागला आहे. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत तर अनेक विद्यार्थी काठावर पासदेखील झाले आहेत. काही विद्यार्थी नापासदेखील झाले आहेत. नापास झालेले विद्यार्थी लगेच टेन्शन घेतात. परंतु दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दहावीच्या नापास विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एटीकेटी परीक्षा घेण्यात येणार आहे.

दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर यामध्ये ८६ हजार ६४१ विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी पात्र आहेत. तर ३४ हजार ३९३ विद्यार्थी एटीकेटीसाठी पात्र असल्याची माहिती राज्य मंडळाने दिली आहे. दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २४ जून ते १७जुलै दरम्यान पुरवणी परीक्षा(Supplementary Examination) घेण्यात येणार आहे.
एटीकेटीसाठी (ATKT) पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा होणार आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. पुरवणी परीक्षेतून दर्जा सुधारण्याची अन् उत्तीर्ण होण्याची संधी मिळणार आहे.
दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना ३५ पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. त्यामुळे त्यांना अकरावीसाठी प्रवेश घेता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता पुन्हा एकदा दहावीची परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. या परीक्षेत पास झाल्यानंतर तुम्ही अकरावीसाठी प्रवेश घेऊ शकणार आहात. त्यामुळे नापास झालेल्या विद्यार्थ्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला पुन्हा एकदा पुरवणी परीक्षा देता येणार आहे.