जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२ । सर्व राज्य मंडळे, CBSE, ICSE आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) द्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या ऑफलाइन परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की अशा याचिका दिशाभूल करणाऱ्या आहेत आणि विद्यार्थ्यांना खोटी आशा देतात.
CBSE 10वी, 12वीच्या परीक्षा ऑनलाइन करण्याच्या प्रकरणी, याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आहे. गतवर्षीप्रमाणे परीक्षा घेण्याचे आदेश द्यावेत, असे याचिकाकर्त्याने म्हटले होते.
न्यायमूर्ती एएम खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, तुमच्या याचिकेवर विचार करणे म्हणजे आणखी गोंधळ निर्माण करणे होय. आधीच जनहित याचिकेच्या नावाने हा अर्ज दाखल करून तुम्ही विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते प्राधिकरणाला जाऊन सांगा, असे न्यायालयाने सांगितले.
न्यायालयाने म्हटले, “गेल्या चार दिवसांपासून तुम्ही अशा जनहित याचिकांद्वारे केवळ गोंधळच वाढवत नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये खोट्या आशाही निर्माण करत आहात. हा जनहित याचिकांचा बेजबाबदार गैरवापर आहे.”
हे देखील वाचा :
- उद्या महायुतीचा शपथविधी? संभाव्य मंत्र्यांची नावे समोर, जळगावातील या आमदारांचा समावेश?
- महायुतीत मुख्यमंत्री निवडीसाठी मोठ्या हालचालींना वेग; कोण होणार मुख्यमंत्री?
- सोन्याने उधळला दरवाढीचा गुलाल; जळगावात आज प्रति ग्रॅमचा भाव किती?
- आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला राहील; वाचा रविवारचे तुमचे राशिभविष्य
- जळगावकरांचे प्रचंड आभारी आहे; “हॅट्ट्रिक” साधून विजयी झाल्यानंतर आ. राजूमामांची प्रतिक्रिया