⁠ 
मंगळवार, ऑक्टोबर 22, 2024
Home | राष्ट्रीय | सर्वसामान्यांना मोठा दिलासा! ‘ही’ 100 औषधे स्वस्त होणार

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! ‘ही’ 100 औषधे स्वस्त होणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ फेब्रुवारी २०२४ । आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारकडून देशवासीयांना महागाईतून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातच सरकारने आणखी एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सरकारनं अनेक औषधांचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या देशात आजारांवर उपचार करणं खूप महाग होत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं हा सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. संसर्ग, ताप, कोलेस्ट्रॉल तसंच शुगरसह 100 औषधे स्वस्त होणार आहेत. NPPA म्हणजेच नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने 69 नवीन फॉर्म्युलेशनची किरकोळ किंमत आणि 31 ची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. 

या निर्णयामुळे वेदना, कोलेस्टेरॉल, मधुमेह, ताप, अतिरक्तस्त्राव थांबवणे, संसर्ग, कॅल्शियम, लहान मुलांसाठी अँटीबायोटिक्स, व्हिटॅमिन डी3 यासह अँटीवेनम औषधंही स्वस्त होणार आहे. सर्पदंशावर उपचारासाठी अँटीवेनमचा वापर केला जातो. NPPA च्या नवीन ऑर्डरमुळे 100 औषधे स्वस्त होणार आहे.

महिनाभरात दुसऱ्यांदा औषधांच्या किमतीत कपात केल्याने सर्वसामान्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे आता उपचार करणं स्वस्त होणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.