जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२२ । राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प (budget2022-23) मांडला. या अर्थसंकल्पामधून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे. जळगावसह १६ जिल्ह्यात प्रत्येकी १०० खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन करण्यात येतील, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.
यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीवर भर दिला असल्याचे पवार यांनी सुरुवातीला सांगितले. यंदा राज्य सरकारने आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटींची तरतूद केली आहे. तसेच कर्करोग व्हॅनसाठी 8 कोटींची तरतूद केली आहे. तसेच राज्यातील १६ जिल्ह्यांत प्रत्येकी 100 खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे देखील त्यांनी जाहीर केले.अकोला आणि बीड येथे स्त्री-रोग रुग्णालयाचे बांधकाम हाती घेण्यात आल्यााची माहितीही त्यांनी दिली.
या १६ जिल्ह्यांचा समावेश
जळगाव, हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, भंडारा, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे.