जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२३ । होळीसारखा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यात रेल्वे प्रशासनाकडून अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांची गरसोय होत आहे. अशातच आता भुसावळ विभागातून धावणाऱ्या 10 रेल्वे गाड्या आज म्हणेजच रविवारी रद्द केल्या आहेत. तर दोन गाड्या या शाॅर्ट टर्मिनेट केल्या असून, १६ गाड्यांचे मार्ग बदलले आहेत.

आज या गाड्या रद्द?
पश्चिम रेल्वेच्या उधना यार्ड रिमॉडेलिंग आणि एनईच्या कामामुळे ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे आज पश्चिम रेल्वेतून सूरतकडून येणाऱ्या व जाणाऱ्या १० रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. त्यात (२२१३७) नागपूर-अहमदाबाद एक्सप्रेस, (०९०५१) मुंबई-भुसावळ स्पेशल फेअर एक्स्प्रेस, (२०९२५) सुरत-अमरावती एक्सप्रेस, (१९००५) सुरत-भुसावळ एक्स्प्रेस, (१११२७) भुसावळ-कटनी एक्स्प्रेस (साेमवारी िद. ६ रोजी) या गाड्यांचा समावेश आहे. तसेच अप मार्गावरील गाड्यांमध्ये (२२१३८) अहमदाबाद-नागपूर एक्सप्रेस, (२०९२६) अमरावती-सुरत एक्सप्रेस, (१९००७) सुरत-भुसावळ एक्स्प्रेस, (१९००६) भुसावळ-सुरत एक्स्प्रेस या गाड्या रद्द झाल्या आहेत. तसेच (१११२८) कटनी – भुसावळ एक्स्प्रेस ही गाडी मंगळवारी (दि. ७) कटनी येथून सुटणारी गाडी रद्द केली आहे.
या गाड्यांच्या मार्गात बदल?
तसेच काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यात (१९०४५) सुरत-छपरा ही गाडी रविवारी (दि. ५) सुरतहून सुटणार आहे, ती वडोदरा, रतलाम, संत हिरदारामनगर मार्गे धावणार आहे. ओखा – शालीमार – ओखा ही गाडी रविवारी छायापुरी, नागदा, मस्की जंक्शन, संत हिदारामनगर, भोपाळ, इटारसी, नागपूरमार्गे धावणार आहे. राजकोट-रिवा ही गाडी रविवारी छायापुरी, नागदा, मस्की जंक्शन, संत हिरदारामनगर, भोपाळ, इटारसी मार्गे वळवली आहे. अहमदाबाद – चेन्नई ही गाडी अहमदाबादहून सुटेल, रविवारी छायापुरी, नागदा, मस्की जंक्शन, संत हिरदारामनगर, भोपाळ, इटारसी, नागपूर, वर्धा मार्गे वळवली जाईल, अहमदाबाद-हावडा ही गाडी रविवारी अहमदाबादहून सुटणार आहे, ती छायापुरी, नागदा. मस्की जंक्शन, संत हिरदारामनगर, भोपाळ, भुसावळमार्गे वळवली जाईल, अहमदाबाद-बरौनी ही गाडी सोमवारी (दि. ६) अहमदाबादहून सुटणारी गाडी छायापुरी, नागदा, मस्की जंक्शन, बिनामार्गे वळवली जाईल, अहमदाबाद-पुरी ही गाडी रविवारी अहमदाबादहून सुटेल, ती छायापुरी, नागदा मार्गे वळवली जाईल. मस्की जंक्शन, संत हिदाराम नगर, भोपाळ, भुसावळ मार्गे जाणार आहे. चेन्नई – अहमदाबाद गाडी शनिवारी (दि. ४ मार्च) भुसावळ कॉर्ड लाईन, अकोला, भोपाळ, संत हिरडाराम नगर, माकसी, नागदा, छायापुरीमार्गे वळवली आहे.
छपरा – सुरत ही गाडी शनिवारी (दि. ४) छपरा येथून निघेल, ती भोपाळ, माकसी, रतलाम, गोध्रा, वडोदरा, सुरत मार्गे वळवली जाईल. पुरी अहमदाबाद पुरीहून सुटणारी गाडी शनिवारी (दि. ४) भुसावळ कॉर्ड लाइन, अकोला, भोपाळ, माकसी, नागदा, छायापुरी मार्गे वळवली जाईल. मालदा टाउन - सुरत ही गाडी मालदा टाउनहून शनिवारी (दि. ४) निघेल. ही गाडी भुसावळ कॉर्ड लाइन अकोला, भोपाळ, संत हिरडाराम नगर, माकसी, नागदा, वडोदरा मार्गे वळवण्यात येईल. वांद्रे टर्मिनस – सहरसा ही गाडी वांद्रे टर्मिनसवरून सुटेल शनिवारी (दि. ४) वडोदरा, नागदा, मकसी, भोपाळ, इटारसी मार्गे वळवली आहे.
रिवा-एकतानगर ही गाडी शनिवारी (दि. ४) इटारसी, भोपाळ, माकसी, नागदा, वडोदरा मार्गे वळविली आहे. पुरी – गांधीधाम ही गाडी पुरीहून सुटणार असून शनिवारी (दि. ४), शालीमार – पोरबंदर ही गाडी शालिमारहून सुटणार असून शनिवारी (दि. ४) भुसावळ कॉर्ड लाइन अकोला, भोपाळ, रतलाम, छायापुरी मार्गे वळवली आहे. सुरत-छपरा क्लोन सुरत आर ही गाडी सोमवारी (दि. ६) वडोदरा, नागदा, संत हिरडाराम नगर, भोपाळ, इटारसी मार्गे वळविली आहे. काचेगुडा – बिकानेर ही गाडी शनिवारी (दि. ४) काचेगुडा आर ही गाडी अकोला, खंडवा, भोपाल, रतलाम, चित्तोरगढमार्गे वळवली आहे.
ब्लॉकमुळे शाॅर्ट टर्मिनेट केलेल्या गाड्या अशा
(१९००६)भुसावळ – सूरत ही उकाई सोनगढ पर्यंत धावेल आणि उकाई सोनगढ-सूरत दरम्यान ही गाडी रविवारी रद्द केली आहे. तसेच डाऊन मार्गावरील(१९० ०८) भुसावळ -सुरत ही गाडी रविवारी(दि. ५) बारडोलीहू न शॉर्ट टर्मिनेट हाेईल. एकच दिवस हा बदल केला आहे.