⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | सरकारी योजना | गुंतवणूकदारांना होणार फायदाच फायदा! पोस्टाच्या ‘या’ 10 योजनांमध्ये मिळेल जबरदस्त परतावा..

गुंतवणूकदारांना होणार फायदाच फायदा! पोस्टाच्या ‘या’ 10 योजनांमध्ये मिळेल जबरदस्त परतावा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२४ । ज्या लोकांना सुरक्षित आणि हमी परताव्यासह गुंतवणूक आवडते, ते बहुतेक बँकांमध्ये गुंतवणूक करतात. पण बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसअंतर्गतही अनेक योजना चालवल्या जातात. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना अशा आहेत ज्यात चांगले व्याजदर मिळते. त्यामुळे मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदारांना चांगला फायदा होता. कमी गुंतवणूकीत चांगला नफा मिळवून देणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या काही योजनांबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये ४ ते ८.२ टक्के व्याजदर मिळते. सुकन्या समृद्धी योजनेत सर्वाधिक व्याजदर मिळते. ८.२ टक्के व्याजदर या योजनेत दिले जाते.

सुकन्या समृद्धी योजने
सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही २५० रुपयांपासून ते १,५०,००० रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला ८.२ टक्के व्याजदर मिळते.
नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट
नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट योजनेत तुम्ही एक वर्ष, दोन वर्ष आणि ५ वर्षांसाठी गुंतवणूक करु शकतात. १००० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात.
पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट
पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्ही ५०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात.या योजनेत कमीत कमी गुंतवणूकीवरही व्याजदरही दिले जाते.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट
या योजनेत तुम्ही १००० रुपयांपासून बचत करु शकतात. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.या योजनेत७.७ टक्के व्याजदर दिले जाते.

नॅशनल सेव्हिंग रिकरिंग डिपॉझिट अकाउंट
या योजनेत तु्म्ही कमीत कमी १०० रुपये गुंतवणूक करुन अकाउंट उघडू शकतात. या योजनेत जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवू शकतात. या योजनेत चक्रिवाढ व्याज दिले जाते.
नॅशनल सेव्हिंग मंथली इन्कम अकाउंट
नॅशनल सेव्हिंग मंथली इन्कम अकाउंटमध्ये तुम्ही १००० रुपयांपासून ते अगदी ९ लाखांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला चांगले व्याजदर मिळते.
ज्येष्ठ नागरिक बचत प्रमाणपत्र
ज्येष्ठ नागरिक बचत प्रमाणपत्र योजनेत तुम्ही १००० ते ३० लाखांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला ८.२ टक्के व्याजदर मिळते.
पब्लिक प्रोविडंट फंड
पब्लिक प्रोविडंट फंडमध्ये तुम्ही ५ हजार ते १,५०,००० रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकतात.यामध्ये तुम्हाला ७.१ टक्के व्याजदर मिळते.

किसान विकास पत्र
किसान विकास पत्र योजनेत १००० रुपयांपासून गुंतवणूक केली जाते. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.या योजनेत ७.५ टक्के व्याजदर दिले जाते.
महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट
या योजनेत तुम्ही १००० रुपयांपासून ते २ लाखांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला ७.५ टक्के व्याजदर मिळते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.