नागरिकांनो लक्ष द्या ! आज १ जानेवारीपासून बदलले हे १० नियम, त्वरित घ्या जाणून

जानेवारी 1, 2026 11:48 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२६ । आजपासून नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. १ जानेवारी २०२६ ची सकाळ केवळ नवीन वर्षाचा उत्साहच नाही, तर खिशावर परिणाम करणारे अनेक बदल घेऊन आली आहे. हे बदल बँकिंग, कर आकारणी, रेल्वे आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराशी संबंधित आहेत. या नियमांचा तुमच्या आर्थिक नियोजनावर थेट परिणाम होईल हे नियम जाणून न घेतल्यास तुमच्या तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

new rules

आजपासून हे नियम बदलले

Advertisements

एलपीजी गॅस
दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल होतात. आजदेखील हे बदल झाले आहेत. व्यावसायिक गॅसच्या किंमती १११ रुपयांनी वाढल्या आहेत.

Advertisements

आधार पॅन कार्ड लिंकची डेडलाइन
आधार आणि पॅन कार्ड लिंक करायची डेडलाइन संपली आहे. आता तुम्हाला यापुढे आधार पॅन कार्ड लिंक करता येणार नाही. यामुळे ज्यांनी अजून हे काम केले नाही त्यांचे पॅन कार्ड बंद होणार आहे.

नवीन आयटीआर फॉर्म
२०२६ पासून नवीन इन्कम टॅक्स फॉर्म लागू होणार आहेत. याची प्रोसेस आजपासून सुरु झाली आहे. यामध्ये तुम्हाला बँक ट्रान्झॅक्शन आणि खर्चाची माहिती द्यावी लागणार आहे.

नवीन टॅक्स कायदा
नवीन वर्षात नवीन टॅक्स कायदा लागू केला जाणार आहे. सरकार जुना इन्कम टॅक्स अॅक्ट १९६१ काढून नवीन कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे.१ एप्रिलपासून नवीन अॅक्ट लागू होणार आहे.

पेट्रोल, डिझेलचे दर
आजपासून एव्हिशन फ्यूएलचे दरदेखील बदलले आहेत. हे दर कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. जर कच्च्या तेलाचे दर घसरले तर इंधनाचे दरदेखील बदलतात.

आठवा वेतन आयोग
केंद्रीय कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे ८ व्या वेतन आयोगाची संभाव्य अंमलबजावणी. १ जानेवारी २०२६ पासून हा आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात २० ते ३५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. यामुळे सुमारे ५० लाख कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांचे उत्पन्न वाढेल.

पीएम किसानच्या नियमात बदल
पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांकडे फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. जर फार्मर आयडी नसेल तर योजनेचा हप्ता मिळणार नाही. आता काही राज्यातच हा नियम आहे. भविष्यात संपूर्ण देशात हा नियम लागू केला जाईल.

सीबिल दर ७ दिवसांनी बदलणार
आतापर्यंत क्रेडिट स्कोअर (सीबिल) महिन्याला अपडेट व्हायचा, पण १ जानेवारीपासून तो दर आठवड्याला अपडेट होईल. यामुळे कर्जाचा हप्ता चुकल्यास त्याचा परिणाम तात्काळ तुमच्या रेटिंगवर दिसेल. दुसरीकडे, नियमित हप्ते भरणाऱ्यांना याचा फायदा होऊन लवकर कर्ज मिळू शकेल.

बँक आणि एफडीच्या दरात बदल
नवीन वर्षात बँकेच्या व्याजदरात आणि एफडीमध्ये बदल होणार आहे. यातील व्याजदर बदलणार आहेत. यामुळे ग्राहकांवर परिणाम होणार आहे.

व्हॉट्सअॅप, टेलिग्रामसाठी नियम
आता व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम अॅपसाठी नियम लागू केले आहे. आता या अॅपसाठी फोन नंबर अनिवार्य केला आहे. फोन नंबर ९० दिवसांपर्यंत अॅक्टिव्ह असणे अनिवार्य आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now