---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगाव शहरवासीयांनो लक्ष द्या ! मालमत्ता करात मिळणार ‘इतके’ टक्के सूट

jalgaon manapa
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२४ । जळगाव शहरवासीयांच्या कामाची बातमी आहे. जर तुम्हीही अद्यापही मालमत्ता कर भरलेला नसेल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. मनपाकडून प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला मालमत्ता करात १० टक्के सूट दिली जाते. यंदा आठ दिवस लोटले तरी लाभ मिळत नसल्याने नागरिकांच्या चकरा सुरू आहेत.

jalgaon manapa

दरम्यान सॉफ्टवेअरमध्ये अपडेशन सुरू आहे. त्यामुळे १५ एप्रिलपासून ३१ मे पर्यंत मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रभाग अधिकारी नरेंद्र चौधरी यांनी दिली. मालमत्ता करातून मिळणारा पैसा हेच महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत वेगवेगळ्या योजना राबवून कराच्या भरण्यासाठी नागरिकांना परावृत्त करते.

---Advertisement---

यंदा बराच कालावधीपर्यंत अभय योजना राबवली गेली होती. दरम्यान १ एप्रिलपासून करदात्यांना १० टक्के सूट देण्यात येत असते; परंतु मनपाचे गेल्या वर्षाच्या वसुलीचे काम तसेच सॉफ्टवेअरमध्ये अपडेशन सुरू आहे. त्यामुळे करदात्यांना १०% सूट देण्यात येत नाही

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---