जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२४ । हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणाचे 10 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले आहे. यामुळे धरणातून 19,105 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे तापी नदीला पूर आला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मध्य प्रदेशात आणि विदर्भातील अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. त्यामुळे तापी- पूर्णा नदीला पूर आला असून, हतनूर धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज धरणाचे 10 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले आहे.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/1437317806919009तापी नदीपात्रात 19 हजार 105 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत. यामुळे धरण प्रशासनाने नदी पात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याचबरोबर जनावरांनाही पात्रात न सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.