⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | वाणिज्य | सोने-चांदीच्या किंमतीत घट, रेकॉर्ड स्तरापासून सोने 4 हजार रुपयांनी स्वस्त

सोने-चांदीच्या किंमतीत घट, रेकॉर्ड स्तरापासून सोने 4 हजार रुपयांनी स्वस्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२२ । आज आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी सोन्या-चांदीच्या (Gold Silver Rate Today) दरांमध्ये फेरबदल झाले आहेत. RBI ने रेपो दरात वाढ केल्यामुळे भारतीय बाजाराचा कल बदलला आहे. दुसरीकडे, जागतिक बाजारातून मिळणाऱ्या संकेतांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल दिसून येत आहे. जागतिक बाजारातील घसरणीमुळे आज सोमवारी सकाळी भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या दरातही चढ-उतार दिसून आले. आज जिथे सोन्याचा भाव ५२ हजारांच्या खाली आला आहे, तिथे चांदी ५७ हजारांच्या वर पोहोचली आहे.

MCX वर आजचा सोन्याचा दर :
मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24 कॅरेट शुद्ध सोन्याची फ्युचर्स किंमत 30 रुपयांनी घसरून 51,844 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे, तर चांदी 50 रुपयांनी वाढून 57,414 रुपयांवर व्यवहार करत आहे. मात्र, त्याआधी सोन्याचा व्यवहार 51,793 रुपयांच्या पातळीवर सुरू झाला, तर चांदीने 57,398 रुपयांच्या पातळीवर खुलेआम सुरुवात केली.

दरम्यान, सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 4,232 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

महाराष्ट्रातील दर ;
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,550 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,870 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,580 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,900 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,580 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,900 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,580 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,900 रुपये आहे. जळगावचा आजचा प्रति तोळ्याचा दर 52,400 रुपये इतका आहे. तर चांदीचा 58,500 रुपये इतका आहे.

दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.