जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२ । येथील जी. एच. रायसोनी बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात पेटंट संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच पार पडला. यात १५१ कॉपीराइट्स महाविद्यालयाच्या विद्यार्थी व प्राध्यापकांनी दाखल केले.
यावेळी कार्यक्रमात संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी मानवाद्वारे साकारण्यात येणारे कोणत्याही स्वरूपाचे रचनात्मक कार्य म्हणजे बौद्धिक संपदा आहे. ही आपल्याला दैनंदिन जीवनात विविध स्वरूपात उपयोगास येत असते. तसेच ती आधुनिक काळाची गरज आहे. पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट, ट्रेड सिक्रेट याद्वारे आपण नवनिर्मिती व संशोधनास सुरक्षित करू शकतो, असे सांगितले. अभियांत्रिकीचे अकॅडमीक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.