⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | .. म्हणून देवेंद्र फडणवीस असे वक्तव्य करतात, खडसेंची टीका

.. म्हणून देवेंद्र फडणवीस असे वक्तव्य करतात, खडसेंची टीका

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२२ । भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना जनाब बाळासाहेब असे विधान केले होते. या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी समाचार घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे. खूप प्रयत्न करून देखील सत्ता मिळत नसल्याने फडणवीस यांना फ्रस्टेशन आल्याने ते असे वक्तव्य करत असल्याची टीका माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली आहे.

हिंदुत्वाचे प्रखर विचार मांडणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या लेखणीतून व वाणीतून समाज जागृत करण्याचे काम केले. देवेंद्र फडणीस यांचे वक्तव्य हे पंतप्रधानांनाही मान्य नसेल, कारण नरेंद्र मोदी यांनी कायम बाळासाहेबांचा आदरच केला आहे. खूप प्रयत्न करून देखील सत्ता मिळत नसल्याने फडणवीस यांना फ्रस्टेशन आले. त्यामुळे ते असे वक्तव्य करत आहे.

जरीही शिवसेनेसोबत एमआयएमची युती झाली असती तरी देखील अशा प्रकारे वक्तव्य करणं हे चुकीचेच आहे. जे मी महाराष्ट्राच्या राजकारणात असे वक्तव्य आम्ही कधी अनुभवले नाही असंही एकनाथ खडसे म्हणाले.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

19 मार्च रोजी पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, भाजपला हरवण्यासाठी, पराभूत करण्यासाठी सर्वजण एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कुणीही एकत्र आलं तरीही भारतातील जनता, महाराष्ट्रातील जनता ही मोदीजींच्या पाठिशी आहे आणि ती भाजपला निवडून देईल. आता या सर्व आघाडीत शिवसेना काय करणार याकडे आमचं लक्ष असणार आहे.

हरल्यावर विरोधकांना ईव्हीएम दिसतं, बी टीम दिसते, सी टीम दिसते. ते बोलत असतात त्याकडे फार लक्ष देण्याची आवश्यकता नाहीये असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

आम्हाला पहायलं आहे की, आता सत्तेकरता शिवसेना काय करते. तसंही आता शिवसेनेने हिंदुह्रदयसम्राट ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकरलं आहे. अजानची स्पर्धा सुरू झाली आहे त्याचा परिणाम आहे का पाहू… असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.