जळगाव लाईव्ह न्यूज | १३ सप्टेंबर २०२१ | येथील बुऱ्हाणपुर अंकलेश्र्वर महामार्गावरील खडकाई नदीच्या वाहतुक पुलावरील जीवघेणे खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांच्या नेतृत्वाखाली राज्य महामार्गावरील खड्यांचे श्राद्ध घालून अनोखे आंदोलन करण्यात आले.
यावल ते चोपडा या बुऱ्हाणपुर अंकलेश्वर या मार्गावर नेहमीच मोठया प्रमाणावर वाहनांच्या वर्दळीचा असेलला हा महामार्ग खड्डेमय झालेला आहे. या खड्यांमध्ये पावसाळ्याचे पाणी मोठया प्रमाणावर साचत असून, वाहन चालकांना वाहनचालवितांना या वेळी या रस्त्याचा अंदाज येत नसल्याने या ठीकाणी मोठा अपघात होवुन जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असावेळी दुर्दैवाने एखाद्याचा यात नाहक निरपराध व्याक्तीचा बळी जात असेल तर शासनाच्या अशा गलथान कारभाराचा तसेच खड्यांचा व यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातुन आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महामार्गावरील खड्ड्यांमध्ये बसुन पूजा करून त्याचे श्राद्ध घालण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन तात्काळ हे खड्डे बुजविण्यात न आल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष जनहीत चेतन अढळकर यांनी दिला आहे. याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष शाम पवार, शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, विद्यार्थी सेना गौरव कोळी, विभागाध्यक्ष आबिद कच्छी, विपुल येवले, प्रतिक येवले, राज शिर्के, गणेश माळी, कुणाल बारी, आकाश चोपडे, कमलेश शिर्के आदी सहभागी झाले होते यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेव्दारे करण्यात आलेल्या आंदोलनामुळे सुमारे ३५ मिनिट वाहतुक बंद झाल्याने रस्त्याच्या दोघ बाजुला मोठया प्रमाणावर वाहन थांबल्या वाहतुक विस्कळीत झाली होती.