डंपर व डांबरच्या टँकरची समोरासमोर धडक ; एक ठार, एक जखमी

मार्च 26, 2021 9:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२१ । साकेगावच्या पुढे महामार्गावर असलेल्या मुंजोबा मंदिराजवळ डंपर व विरुद्ध दिशेने येणाऱ्या डांबरच्या टँकरची समोरासमोर झालेल्या धडकेत साकेगावचा युवक ठार तर क्लिनर जखमी झाल्याची घटना आज (ता. २६) पहाटे घडली.

accident jpg webp

साकेगाव महामार्गावर भुसावळकडून जळगावकडे डंपर (क्र. एमएच-१९- झेड- ३१२३) जात असताना त्याच वेळेस डावी बाजू सोडून विरुद्ध दिशेने जळगावकडून भुसावळकडे भरधाव येणाऱ्या डांबर टँकर (क्र. एमएच-१८- बीए-४१८८) या डंपरला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की पहाटे प्रचंड आवाजाने अपघात घटनास्थळाच्या बाजूला असलेल्या ढाब्यावरील कर्मचारी गाढ झोपेतून खडबडून उठले. या अपघातामुळे डंपर व ट्रक चा समोरील भागाचा चुराडा झालेला आहे.

Advertisements

अपघात घडल्यानंतर वार्ता वाऱ्यासारखी पसरताच साकेगाव येथून अपघातस्थळी नागरीकांचा जथ्थे पहाटे रवाना झाले. यामध्ये साकेगावचा डंपर चालक देवानंद नथू पाटील (वय ३५) हा चालक डंपरच्या कॅबिनमध्ये अडकून गेला होता. त्यास जेसीबीद्वारे मोठ्या परिश्रमानंतर बाहेर काढण्यात आले. रक्तबंबाळ स्थितीत देवानंद म्हणत होता मला जास्त लागलं नाही, मला लवकर दवाखान्यात घेऊन जा माझे प्राण वाचवा. अशा स्थितीत गावातील मंगल कोळी, गजानन कोळी, गजानन जवरे यांनी देवानंदला दुचाकीवर बसून गोदावरी रुग्णालयात घेऊन गेले. मात्र त्याच्या गुप्तांगावर जोराने मार लागल्यामुळे उपचारादरम्यान बोलता- बोलता त्याचे प्राण गेले. बोलता बोलता अचानक प्राण गेल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. तर त्यासोबत असलेला साकेगावचा क्लिनर विकास युवराज कोळी यालाही जबर मार लागला असून पायामध्ये तीन ठिकाणी फॅक्चर झाले आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now