⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | ट्रक खाली दबून हमाल मजूराचा मृत्यू ; जळगाव एमआयडीसीतील घटना

ट्रक खाली दबून हमाल मजूराचा मृत्यू ; जळगाव एमआयडीसीतील घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ एप्रिल २०२१ । ट्रक मागे घेत असतांना ४५ वर्षीय हमाल मजूराचा दबुन मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी एमआयडीसीतील दालमील कंपनीत घडली. गणेश पांडू चव्हाण (वय-४५ रा. लियानी ता. एरंडोल ह.मु. पोलीस कॉलनी) असे मृत मजुराचे नाव असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

 

गणेश चव्हाण हे एमआयडीसीतील दालमिल कंपनीत हमाल म्हणून एक वर्षांपासून कामाला आहे. आज ८ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे ते सकाळी ७ वाजता कामावर गेले. दरम्यान ७.४५ वाजेच्या सुमारास काम करत असतांना (जीजे ३४ टी ९४७७) क्रमांकाच ट्रकमधील माल उतरविण्यासाठी त्याला रिव्हर्स येत होता. त्यावेळी गणेश चव्हाण हे ट्रकच्या मागच्या बाजूला उभे होते. त्यावेळी ट्रकचालकाच्या लक्षात न आल्याने त्यांनी थेट धडक दिली. यात भिंत आणि ट्रकच्या मध्ये दबले गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताच ट्रकचालक ट्रक सोडून घटनास्थळाहून पसार झाला आहे. दालमिल कंपनीच्या मालकाने तातडीने खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

 

अपघात होताच मयत गणेशचव्हाण यांचे नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली होती. कुटुंबियातील सदस्यांनी मृतदेह पाहून हंबरडा फोडला होता. मयताच्या पश्चात पत्नी निर्मलाबाई, गजानन, गोविंदा आणि सनि हे तीन मुले आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीसात ट्रक चालकावर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.