---Advertisement---
जळगाव शहर

खा.शरद पवार १५ एप्रिल रोजी जळगाव जिल्हा दाैऱ्यावर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२२ । राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार १५ एप्रिल राेजी जिल्हा दाैऱ्यावर येणार आहेत. चांदसर येथे माजी आमदार स्व. मुरलीधर पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी ते उपस्थित राहणार आहेत. स्वातंत्र्य सेनानी तथा वसंत कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी आमदार स्व. मुरलीधर पवार यांचा पुतळ्याचे चांदसर तालुका धरणगाव येथे अनावरण करण्यात येत आहे.

sharad pawar jpg webp

या कार्यक्रमासाठी खासदार शरद पवार हे १५ एप्रिल राेजी सकाळी ९ वाजता चांदसर येथे येणार आहेत. या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, आदी उपस्थित राहणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा समन्वयक विकास पवार, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी दिली.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---