⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

ऐतिहासिक : ६२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी नावारूपाला आला आपला ‘जळगाव जिल्हा’

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२२ । देशभरात आणि जगभरात सध्या केळीसाठी प्रसिद्ध असलेला जळगाव जिल्ह्या 1960 सालाच्या आधी पूर्व खानदेश म्हणून ओळखला जायचा. 21 ऑक्टोबर 1960 यादिवशी पूर्व खानदेश चे नामांकन जळगाव जिल्हा करण्यात आले. ज्याला आज तब्बल 62 वर्ष पूर्ण होत आहेत.

1960 च्या पूर्वी खानदेश आणि आताचा जळगाव जिल्हा यात खूप बदल होते. जळगाव जिल्ह्यात 16 तालुके होते. आता पंधरा तालुके आहेत. नंतर बोदवड आणि धरणगाव हे दोन स्वतंत्र तालुके तयार करण्यात आले आहे. 1906 मध्ये खानदेशचे दोन स्वतंत्र जिल्हे करण्यात आले. यात पूर्व खानदेश म्हणजे आत्ताचा जळगाव आणि पश्चिम खानदेश मध्ये धुळे – नंदुरबार या दोन जिल्ह्यांचा समावेश होता. नंतरच्या काळात पश्चिम खानदेश याचे धुळे आणि नंदुरबार असे दोन जिल्हे तयार झाले. ब्रिटिश काळात जळगाव जिल्ह्यात आय.सी.एस अधिकारी काम करत त्यानंतर त्यांची जागा आय ए एस अधिकाऱ्यांनी घेतली. जळगाव जिल्ह्याचा विस्तारक पश्चिम आणि पूर्व असा 120 किलोमीटर आहे. उत्तर दक्षिण ११० किलोमीटर आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 1,17,64 चौरस किलोमीटर इतके आहे.

1950 च्या काळात हैदराबाद राज्यात चाळीसगाव तालुक्यातील 15 गावे समाविष्ट करण्यात आली होती. ही गावे सध्या औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. नरसिंगपूर, मक्रपुर, मालपुर, वडाळी, भोकनगाव, पळसगाव, वनशेंद्रा, हातनुर, जळगाव या गावांचा समावेश आहे. म्हणजे हीच सर्व गाव आणि जळगाव जिल्ह्यात होती. मात्र 1950 साली ही हैदराबाद राज्यात म्हणजे निजामांना देण्यात आली. त्याचा विसरतांच्या नागरिकांना पडला आहे. सध्या हि गाव आता औरंगाबाद जिल्ह्यात आहेत.

देशभरात होणाऱ्या एकूण केळी उत्पादनापैकी 20 टक्के केळी उत्पादन एकट्या जळगाव जिल्ह्यात होती. यामुळेच 1960 पूर्वीच संपूर्ण देशात जळगावहून केळी पाठवली जात होती. त्याकाळी सावदा हे केळी वाहतुकीचे मुख्य केंद्र होते. याचबरोबर 24 कॅरेट सोन्याचे दागिनेही जळगावतच मिळत असत. यामुळे पूर्वीही जळगावच्या सराफ बाजाराला मोठी प्रतिष्ठा होती.